पंढरपूर कॉरिडॉर विरोधात कडकडीत बंद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

पंढरपूर कॉरिडॉर विरोधात कडकडीत बंद

 पंढरपूर कॉरिडॉर विरोधात कडकडीत बंद

बाधितांचा तहसिल कार्यालयावर मोर्चा; “कॉरिडॉर रद्द करा”ची जोरदार मागणी



पंढरपूर (कटूसत्य वृत्त): येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये प्रस्तावित कॉरिडॉरच्या विरोधात पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती**च्या वतीने सोमवार, २ मार्च रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. “एकच जिद्द, कॉरिडॉर रद्द”, “जुलमी कॉरिडॉर रद्द करा” अशा घोषणांनी शहर दणाणून गेले.

मोर्चाची सुरुवात महाद्वारातील नामदेव पायरी येथे संत संत नामदेव महाराज यांच्या पायरीचे पूजन करून करण्यात आली. वारकरी संप्रदायातील माऊली महाराज शिरवळकर, वडगावकर महाराज, देहूकर महाराज यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर मोर्चाला प्रारंभ झाला.

सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांनी मोर्चात सहभाग घेतला. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. तहसिलदार सचिन लंगुटे यांना निवेदन देण्यात आले.

प्रमुख मागण्या

  • पंढरपुरातील बिगरवापरातील सरकारी जागांवरच कॉरिडॉर उभारावा.

  • वारकरी बांधवांच्या सोयींसाठी वापरल्या जाणाऱ्या घरांचे पाडकाम करू नये.

  • बाधितांचे पुनर्वसन व हितसंबंध सुरक्षित ठेवावेत.

या मोर्चात बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, नगरसेवक शिंदे-नाईक, किरण घाडगे, वडगावकर महाराज, शिरवळकर महाराज, वट्टमवार, डॉ. प्राजक्ता बेणारे, बिडकर आदींनी भाषणे केली.

यावेळी आमदार अभिजित पाटील उपस्थित राहून आपले मत व्यक्त केले. तसेच नानासाहेब कवठेकर, नगरसेवक ओंकार जोशी, रा. पां. कटेकर, गणेश लंके, वैभव बडवे, अनिल गवळी, प्रशांत खंडागळे, यशवंत बेणारे, उंडाळे आदींसह अनेक नागरिक सहभागी झाले होते.

कॉरिडॉर प्रकल्पाबाबत शहरात मतभेद तीव्र होत असून, शासनाने स्थानिकांच्या भावना व मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages