कन्हेरगाव येथे ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ कार्यक्रम उत्साहात
कन्हेरगाव (कटूसत्य वृत्त): छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कन्हेरगाव (ता. माढा) येथे ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सीमालवाडी (जि. कोल्हापूर) येथील गुरुमाऊली प्रस्तुत या कार्यक्रमास शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन ‘गर्जा महाराष्ट्र माझा’चे सर्वेसर्वा जयदीप डाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, तर रंगमंचाचे पूजन सरपंच श्रीकांत बनसोडे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे जिवंत दर्शन घडले. पिंगळा, वासुदेव, दिंडी सोहळा, भारुड, पोतराज, वाघ्या-मुरळी, ज्योतिबा गीत, गोंधळ, ओवी, गणेश सोहळा, शेतकरी नृत्य, कोळी नृत्य, विनोदी लावणी, जोगवा तसेच शिवराज्याभिषेक सोहळा अशा विविध पारंपरिक कलाप्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी कन्हेरगाव येथील सागर बालाजी केदार याने हाताने व डोक्याने नारळ फोडून आपली अनोखी कला सादर केली. कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शिवजयंतीच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून टाकले.
No comments:
Post a Comment