जिल्हा परिषदेत बंधुभावाचा इफ्तार सोहळा : मराठा सेवा संघाचा अनोखा उपक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने मराठा सेवा संघाच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मुस्लिम कर्मचारी बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.
या इफ्तार सोहळ्यास सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) स्मिता पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, शिक्षण अधिकारी प्राथमिक कादर शेख, कार्यकारी अभियंता बांधकाम नरेंद्र खराडे, संतोष कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “धर्म, जात आणि पंथ वेगवेगळे असले तरी आपण सर्वजण एकाच कुटुंबाचा भाग आहोत. अशा कार्यक्रमांमुळे समाजात बंधुभाव, आपुलकी आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मराठा सेवा संघाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असून हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.”
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, परस्पर सन्मान आणि एकात्मतेचा सुंदर संदेश देण्यात आला. इफ्तारच्या वेळी सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्र येऊन रमजान महिन्याच्या पवित्रतेचा अनुभव घेतला.
यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे, सचिन साळुंखे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेश देशपांडे, दिनेश बनसोडे, प्रदीप सगट, संतोष माने, निलेश देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास चेळेकर, सुधाकर माने-देशमुख, सुर्यकांत मोहिते, सचिन चव्हाण, चेतन भोसले, आनंद साठे, विकास भांगे, रणजित गव्हाणे, संतोष शिंदे, अनिल पाटील, वासुदेव घाडगे, विशाल घोगरे, अभिजीत निचळ, संतोष सातपुते, भूषण काळे, उमेश खंडागळे, प्रकाश शेंडगे, मनोज साठे, गोपाल शिंदे, संजय पाटील, रविंद्र शेंडगे, महेंद्र माने, सुभाष तनमोर, शशि साळुंखे, विठ्ठल मलपे, संतोष शेळके, नितिन पाटील आदी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ममता काशेट्टी, वैशाली रंपुरे, श्रीमती शशिकला सुतार, गौरी कदम, ज्योती माळी, ज्योत्सना साठे, कृष्णा अधटराव, सिद्धेश्वर जक्का, शुभम खरे, सत्यजित कमळे, रोहित शिंदे, सागर शेंडगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या सर्वांच्या सहकार्यामुळे जिल्हा परिषद सोलापूर येथे आयोजित केलेला इफ्तार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा सुंदर संदेश देणारा ठरला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महताब शेख यांनी तर आभार अविनाश गोडसे यांनी मानले.

No comments:
Post a Comment