धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला अभिवादन: श्रीतेज पवार यांचा अभिनव उपक्रम
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-
अकरावीत शिकणाऱ्या श्रीतेज पवार या तरुण विद्यार्थ्याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाच्या स्मृती जागवण्यासाठी 'बलिदान मास' पाळून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाची गाथा घराघरांत पोहोचवण्याचा ध्यास श्रीतेजने घेतला आहे
महाराजांच्या आयुष्यातील संघर्षावर आधारित संवादांचे आयोजन केले.
'छावा' सारख्या ऐतिहासिक कादंबऱ्यांचे वाचन आणि त्यावर चर्चा घडवून आणली.
बलिदान दिनानिमित्त महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मौन पाळत अभिवादन करण्यात आले.
श्रीतेज पवार म्हणाला, "छत्रपती संभाजी महाराज हे केवळ इतिहासातील पात्र नसून ते तरुणांसाठी संघर्षाचे प्रतीक आहेत. कठीण प्रसंगात डगमगून न जाता स्वार्थापेक्षा स्वराज्याला महत्त्व कसे द्यावे, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. म्हणूनच हा बलिदान मास मी माझ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न केला."
अल्पवयीन असूनही इतिहासाप्रती असलेली श्रीतेजची ही निष्ठा पाहून परिसरातील नागरिक आणि ज्येष्ठ इतिहासप्रेमींकडून त्याचे कौतुक होत आहे. येणाऱ्या काळात अशा उपक्रमांमुळे तरुणांना इतिहासाची खरी ओळख मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment