दिपक रणदिवे सर यांची राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कारासाठी निवड
आटपाडी (कटूसत्य वृत्त):-
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ व सातारा कलाध्यापक संघ यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष सन 2025 - 26 या सालातील राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या, दाजी पाटलोजी विद्यालय व श्रीरंग दाजी देवकर ज्युनिअर कॉलेज, वेजेगाव ता.खानापूर जि. सांगली या विद्यालयातील उपक्रमशील कलाशिक्षक श्री दिपक रणदिवे सर यांना जाहीर झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या मधील सुप्त कलागुणांचा विकास साधण्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणारे विद्यार्थी प्रिय कलाशिक्षक म्हणून श्री . दिपक रणदिवे हे परिचित आहेत.
कला विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी आणि व्यावसायिक दृष्टिकोन याचे सातत्याने मार्गदर्शन करतात.
विविध चित्रकला स्पर्धा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, पोस्टर्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून विद्यार्थ्यांना संधी निर्माण करून देतात. तसेच कला विषयाच्या जनजागृतीसाठी व विकासासाठी धडपडणारे कलाशिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीने समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्यस्तरीय पुरस्काराने जबाबदारी आणखी वाढल्याचे दिपक रणदिवे सर यांनी म्हटले आहे.

No comments:
Post a Comment