सावळेश्वर टोल नाक्यावर चालकाला बेदम मारहाण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 25, 2026

सावळेश्वर टोल नाक्यावर चालकाला बेदम मारहाण

 सावळेश्वर टोल नाक्यावर चालकाला बेदम मारहाण




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- टोल देण्याच्या कारणा वरून मालट्रक चालक व सावळेश्वर टोल नाक्यावरील कर्मचारी यांच्या झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीत झाले टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी चालकाला बेदम मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले.

त्याला तातडीने अधिक उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. सिद्धू स्वामी वय 32 रा बसवकल्याण असे गंभीर जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे.

ही घटना मंगळवार ता 24 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. टोल नाक्यावर राडा झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या सुमारे दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या.

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार, सोलापूर हून पुण्याकडे चालक सिघ्दु स्वामी हा मालट्रक घेऊन निघाला होता. त्याची ट्रक सावळेश्वर टोल नाक्यावर आल्यावर टोल नाका कर्मचारी व चालक स्वामी यांच्यात टोल देण्याच्या कारणा वरून बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत होऊन चालक स्वामी याला बेदम मारहाण करण्यात आली.

मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे पाहून स्वामी याच्या अन्य सहकारी चालकांनी टोल नाक्यावर राडा केला, मोठ्या प्रमाणात तोडफोड केली व अघोषित रास्ता रोको केला. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या.

दरम्यान राज्य राखीव पोलीस दलाला पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन माळी, वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्ना नंतर वाहतूक सुरळीत झाली. पंढरपुरात चालकाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा चालकाला मारहाण झाल्याने चालकात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. रात्री उशिरा पर्यंत या घटनेचा मोहोळ पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages