छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज सलग चौथ्या वर्षी उत्कृष्ट महाविद्यालय - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 26, 2026

छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज सलग चौथ्या वर्षी उत्कृष्ट महाविद्यालय

 छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज सलग चौथ्या वर्षी उत्कृष्ट महाविद्यालय




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत गेल्या चार वर्षापासून महाविद्यालयात करिअर संदर्भात जनजागृती करण्यासाठी आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने गेल्या पाच वर्षापासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,  उद्योजकीय विकास कौशल्य उपक्रम, व्यक्तिमत्व विकास, करिअर संसदेची स्थापना, पूरग्रस्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मदत, कौशल्य विकास, ड्रोन फ्लाईंग प्रशिक्षण, समृद्धी महामार्गावरील करिअरच्या संधी, मतदान जनजागृती कार्यक्रम, आर्थिक साक्षरता अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर भरीव अशा प्रकारचे कार्य केले आहे. या कार्याची दखल घेऊन 2025-26 चा उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाला मिळाला आहे. उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार मिळण्याचे हे छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे सलग चौथे वर्ष आहे. 
राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष  रवींद्र साठे, उच्च शिक्षण संचालक  शैलेंद्र देवळाणकर, माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे प्रमुख  यशवंत शितोळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. महाविद्यालयाला सलग चौथ्या वर्षी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल
मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा माजी महापौर  मनोहरपंत सपाटे ,  प्रा. महेश माने,  सुरेश पवार, मुकुंद जाधव, सचिन गायकवाड, दत्ता भोसले, प्राचार्य डॉ. नितीन मोटे, इत्यादींनी करिअर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक डॉ. वाल्मिक कीर्तीकर व करियर कट्टा उपक्रमातील सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages