सीना- माढा उपसा सिंचन योजना सुरूच राहणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 26, 2026

सीना- माढा उपसा सिंचन योजना सुरूच राहणार

 सीना- माढा उपसा सिंचन योजना सुरूच राहणार

आ. अभिजीत पाटील यांच्या पुढाकारातून ना.विखे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आदेश



माढा (कटूसत्य वृत्त):- सध्या काही लोक अफवा पसरवून, शेतकऱ्यांना वेटीस धरत असल्याचे दिसत आहेत, तरी कोणीही कोणत्याही भूलथापांना किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत टेल टू हेड पाणी पोचेपर्यंत आम्ही कटिबद्ध असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधानभवनात भेट घेऊन सीना -माढा उपसा सिंचन योजना बंद न करण्याबाबतचे पत्र दिले असता, योजनेवर मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टी थकीत असली तरी हि योजना परिसरातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरत असल्याचे सांगितले.

हि योजना बंद झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर याची तात्काळ दखल घेत विखे-पाटील साहेबांनी लगेचच फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांना योजना सुरू ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले.

या योजनेतून टेल टू हेड शेतकऱ्यांना पाणी मिळेपर्यंत सुरळीत चालणार असल्याची नोंद सर्व शेतकरी बांधवांनी घेण्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages