हायवे कामासंदर्भात लवकरच मंत्री गडकरींना भेटणार- राजेद्र राऊत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 25, 2026

हायवे कामासंदर्भात लवकरच मंत्री गडकरींना भेटणार- राजेद्र राऊत

 हायवे कामासंदर्भात लवकरच मंत्री गडकरींना भेटणार- राजेद्र राऊत





बार्शी (कटूसत्य वृत्त):- नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत बार्शी शहर समांतर पाणीपुरवठा आणि टेंभुर्णी ते लातूर नूतन फोर लेन हायवे संदर्भात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आमचे पूर्तता करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

त्यासाठी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक असल्याने लवकरच त्या संदर्भात आम्ही त्यांची भेट घेऊन या अडचणी सोडवण्यासंदर्भात त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार असल्याचे राऊत त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, मुख्याधिकारी तैमूर मुलांणी, नगर परिषदेतील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, सेविका, आजी-माजी नगरसेवक, सेविका, नगरपरिषदेतील बहुतांश सर्व पदाधिकारी, टेंभुर्णी ते व्हाया बार्शी येडशी-लातूर नवीन फोर लेन हायवे मार्गावरील देखरेख करणारे संबंधित अधिकारी यासह रविवारी बार्शी शहर पाणीपुरवठा कंदर येथील जॅकवेल आणि दुतर्फा हायवे वरील अडीअडचणीची पाहणी करण्याचे उद्देशाने दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी माजी आमदार राऊत बोलत होते.

अमृत २ योजनेंतर्गत शहर पाणीपुरवठ्यासाठी समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी २९६ कोटी रुपये मंजूरही आहेत. पण मध्यंतरी नगरपरिषदेचा कारभार प्रशासनिक अधिकारी यांच्या हाती असल्याने काही गोष्टीला विलंब लागला. आता नव्याने हायवे तयार झाला की नंतर पाणीपुरवठा योजना राबवण्यात जिकरीचे होऊन बसेल. खोदाई करता येणार नाही. भूसंपादन आणि इतर नुकसानभरपाईचा अपेक्षित खर्च सुरुवातीला ४५ ते ५० कोटी लागतील असा अंदाज होता. पण आता तो १०० कोटी वर गेलेला आहे. शिवाय रस्ते कामासाठीसुद्धा आणखी २५० कोटीची तरतूद करणे आवश्यक आहे.

संबंधित नॅशनल हायवे पदाधिकारी, जिल्हा परिषद आणि संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्याचा विचार आहे. २३ मीटरच्या पुढे धोका असल्याने भू संपादन प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. यामध्ये शेतकरी, व्यापारी, मार्गावरील कोणाचीही गैरसोय किंवा अडचण होता कामा नये, याची दक्षता घेण्यात येईल. आम्ही ते आश्वासन पूर्ण करूही शकतो. आज पाहणी दौऱ्यामध्ये नव्याने उद्भवलेल्या काही अडचणीमुळे त्यांचे पूर्तता करण्यासंदर्भात आणखी निधीची आवश्यकता पडणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages