सोलापुरात पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैध डान्सबार सुरू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 24, 2026

सोलापुरात पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैध डान्सबार सुरू

 सोलापुरात पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैध डान्सबार सुरू 



 विधानसभेत आमदार सुभाष देशमुख यांचा खळबळजनक आरोप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-
सोलापूर शहरात काही ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैधरित्या डान्सबार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत केला. या डान्सबारमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असून सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणीही त्यांनी केली.
देशमुख म्हणाले की, सोलापूर शहरासह विशेषतः दक्षिण तालुक्यातील काही ग्रामीण भागांत अवैधरित्या डान्सबार सुरू आहेत. यासंदर्भातील व्हिडिओ क्लिप त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाकडे दिल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली. संबंधित क्लिपनंतर काही पोलीस अधिकाऱ्यांनी डान्सबारमध्ये जाऊन पाहणी केली. मात्र अधिकारी बाहेर येताना दिसत असले तरी संबंधित डान्सबारवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला.
यामुळे हे डान्सबार पोलिसांच्या संरक्षणाखालीच सुरू असल्याचा संशय निर्माण होत असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
दरम्यान, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका सभागृहात मांडली. त्यामुळे सोलापूरकरांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages