लढा सोलापूर महापौर पदासाठी...
मराठा समाजावर राजकीय अन्याय…
ज्या मराठ्यांनी हिंदवी स्वराज्य साठी स्वतःच रक्त सांडल.
भाजप च्या स्थानिक काही प्रमुख लोकांनी मराठा समाजावर केलेल्या राजकीय अन्याय विरोधात मराठ्यांना रक्तांनी पत्र लिहण्यासाठी आणि आज मराठ्यांना मुंडण आंदोलन करण्याची वेळ या लोकांनी आणली.
मराठा समाजावर झालेल्या राजकीय अन्याय विरोधात मराठा आंदोलक तथा मराठा क्रांती मोर्चा राज्यसमन्वयक राम भैय्या जाधव यांनी स्वतः च मुंडण केले.यावेळी समाज बांधव उपस्थित होते.
जो पर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही तेव्हा पर्यंत हा लढा चालू राहील.
१९९३ नंतर ३२ वर्षापासून मराठा समाजाला महापौर पासून वंचित ठेवले होते.यंदा ३ दशकानंतर मराठा समाजाचा महापौर करण्याची भाजप ला संधी असताना भाजप च्या शहरातील काही प्रमुख लोकांनी मराठा समाजाचा महापौर होऊन दिले नाही.
१९९३ नंतर..
३ वेळा पद्मसाली समाजाला,
२ वेळा मुस्लिम समाजाला,
२ वेळा लिंगायत समाजाला,
२ वेळा लमाण समाजाला,
तर एकदा ब्राह्मण,कैकाडी,धनगर समाजाला विविध पक्षांतून न्याय देण्यात आला आहे.
मराठा समाज गेली ३२ वर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ साली मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यावर आणि २०२५ साली अण्णासाहेब पाटील महामंडळ साठी ७०० कोटी दिल्याबद्दल महाराष्ट्रात पहिला सत्कार आम्ही केला होता.
सोलापूर मनपा महापौर मराठा समाजाला डावल्यामुळे जिल्हा परिषद ६८ पैकी ५५+ उमेदवार निवडून आण्याचा स्वप्न भाजप पक्षाने पाहील होत पण शहरातील भाजप च्या काही प्रमुख लोकांनी मराठा समाजाचा महापौर होऊन दिला नाही. जिल्हापरिषद ६८ पैकी भाजपच्या विरोधात ३० जण निवडून आले आहेत.त्या मराठा द्वेषींना हे उत्तर आहे. आम्ही कुठल्या व्यक्ती किंवा जाती च्या विरोधात नाही.प्रत्येक समाज हा मराठा समाजाचा लहान भाऊ आहे म्हणून गेल्या ३२ वर्षापासून मराठा समाजाचा महापौर न झाल्यामुळे आम्ही मराठा समाजाचा महापौर करावे म्हणून मागणी केली होती.
मराठा समाजावर झालेला हा राजकीय अन्याय समाज कधीच विसरणार नाही….
यापुढे सुद्धा भाजप,काँग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादी व इतर कोणत्याही राजकीय पक्षाकडून शैक्षणिक, राजकीय,नौकरी आणि सामाजिक क्षेत्रात मराठा समाजावर अन्याय झाल्यास मराठा समाज त्या विरोधात आवाज उठवत राहणार🚩🙏
आपला विश्वासू
मराठा आंदोलक
रामभैय्या जाधव
राज्यसमन्वयक-मराठा क्रांती मोर्चा.

.jpeg)

0 Comments