प्रोजेक्ट अमरीत अंतर्गत हातलाई देवीधाराशिव येथे तळे स्वच्छता अभियान ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 25, 2026

प्रोजेक्ट अमरीत अंतर्गत हातलाई देवीधाराशिव येथे तळे स्वच्छता अभियान !

 प्रोजेक्ट अमरीत अंतर्गत हातलाई देवीधाराशिव येथे तळे स्वच्छता अभियान !





कळंब (कटूसत्य वृत्त):-सद्गुरू माता सुधीक्षा जी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या प्रोजेक्ट अमरीत – स्वच्छ जल, स्वच्छ मन या उपक्रमांतर्गत हातलाई देवी, धाराशिव येथे तळे स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले.
या सेवेच्या उपक्रमात धाराशिव शाखेचे संत महापुरुष, माता बहिणी (साध संगत) तसेच युनिट क्रमांक ९७३ चे सेवादल महापुरुष व बहिणींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सर्वांनी श्रमदान करत तळ्यातील गाळ, प्लास्टिक व इतर कचरा काढून परिसर स्वच्छ केला.
“स्वच्छ जल, स्वच्छ मन” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. पर्यावरण संवर्धन आणि जलस्रोतांचे जतन ही काळाची गरज असून, समाजाने अशा उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सेवेच्या या कार्यातून भक्तांनी सेवेचा आनंद घेत “धन निरंकार”चा जयघोष करत पर्यावरण रक्षणाचा संकल्प व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages