शिवप्रसाद उद्योग समूहच्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 25, 2026

शिवप्रसाद उद्योग समूहच्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम

 शिवप्रसाद उद्योग समूहच्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम



नातेपुते (कटूसत्य वृत्त):-    


शिवप्रसाद उद्योग समूह दहिगाव यांचे संकल्पनेतून साकारलेला "होम मिनिस्टर खेळ पैठणीचा" हा कार्यक्रम माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी, फोंडशिरस, पिरळे, पळसमंडळ, कळंबोली, कदमवाडी, चव्हाणवाडी, दहिगाव, तामशिदवाडी
या या गावांमधील महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता. शिवप्रसाद उद्योग समूहाच्या चेअरमन ऋतुजाताई शरद (बापू) मोरे यांनी ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षम करून आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या. यामध्ये सहभागी महिलांनी नृत्य, उखाणे या खेळाचे 
उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण करून अनेक बक्षीस मिळवली यामध्ये प्रथम बक्षीस पैठणी साडी, द्वितीय बक्षीस एक किलो तूप, तृतीय बक्षीस अर्धा किलो तूप आणि एक लिटर नमों:तेल व चतुर्थ बक्षीस रोटी बॉक्स अशी बक्षिसे महिलांनी जिंकली. या कार्यक्रमाचे आयोजन शिवप्रसाद उद्योग समुहाच्या चेअरमन ऋतुजा मोरे, एस.पी.जी. मल्टीस्टेट च्या चेअरमन अश्विनी मोरे,एस.पी.जी. इन्शुरन्स अँड इन्वेस्टमेंट च्या मॅनेजिंग डायरेक्टर,प्रियंका मोरे यांनी केले होते.तसेच कार्यक्रमाचे निवेदन दिपक नाना बारामतीकर यांनी काम पाहिले. सदर कार्यक्रमास हजारोच्या संख्येने महिला व तेथील ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages