भाजपकडून केरळची जबाबदारी कल्याणशेट्टींवर
हंजगी (कटूसत्य वृत्त):- आगामी केरळ राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
नियुक्तीनंतर प्रथमच आमदार सचिन कल्याणशेट्टी हे केरळ दौऱ्यावर गेले. यावेळी तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे केरळमधील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करून सन्मान केला.
या प्रसंगी केरळ राज्य विधानसभा निवडणूक प्रभारी विनोद तावडे तसेच महाराष्ट्रातील सहकारी पदाधिकारी आणि केरळ भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी निवडणुकीत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करून भाजपचा प्रभाव वाढविण्यावर भर दिला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments:
Post a Comment