क्रेडाई सोलापूरतर्फे ३० जानेवारीपासून प्रॉपर्टी एक्स्पो - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 28, 2026

क्रेडाई सोलापूरतर्फे ३० जानेवारीपासून प्रॉपर्टी एक्स्पो

 क्रेडाई सोलापूरतर्फे ३० जानेवारीपासून प्रॉपर्टी एक्स्पो




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- क्रेडाई सोलापूर तर्फे प्लॉट, फ्लॅटस्, रो हाऊझेस्, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, वित्तीय संस्था आदींचे प्रदर्शन यंदा दि. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान नॉर्थकोट हायस्कुल मैदानावर  आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती क्रेडाई सोलापूरचे अध्यक्ष अभिनव साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
         या  प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, दि. ३० जानेवारी रोजी माजी सनदी अधिकारी व मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्या हस्ते व सोलापूर जनता बँकेचे चेअरमन सुनील पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी क्रेडाई नॅशनलचे सदस्य  सुनिल फुरडे, क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शशिकांत जिद्दीमनी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सोमवार दि. २ फेब्रुवारी पर्यंत दररोज स. १० ते रात्रौ ८ दरम्यान सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे. या प्रदर्शनाचे सोलापूर जनता सह बँक हे मुख्य प्रायोजक असून माऊली लँडमार्क व जेजेआरव्ही समर्थ प्रसाद हे सह प्रायोजक आहेत.'
यंदाच्या प्रदर्शनात सुमारे 65 स्टॉल्स् असून सोलापूरातील क्रेडाई सभासदांचे विविध प्लॉटस्, फ्लॅटस्, बंगलोज, रो-हाऊसेस, कमर्शिअल कॉम्प्लेक्स् तसेच अनेक बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, वित्तीय संस्था भाग घेत असून प्रदर्शनाच्या ठिकाणीच गृहकर्जाची माहिती ही मिळणार असल्याची माहिती या प्रदर्शनाचे समन्वयक आनंद पाटील यांनी दिली. सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या प्रदर्शनात रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी क्रेडाई वुमन्स विंग व युथ विंग च्यावतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली.
         वुमन्स विंग व युथ विंग - क्रेडाई सोलापूर शाखेद्वारे क्रेडाई सोलापूर वुमन्स विंग व युथ विंगची स्थापना करण्यात आली असून बांधकाम व्यवसायात महिलांचा व युवकांचा सहभाग, प्रशिक्षण, शैक्षणिक दौरा सक्षमीकरण आदी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत.
           या पत्रकार परिषदेस दक्ष पटेल, संतोष सुरवसे,  किशोर चंडक. गुरुराज येल्लटी, प्रदीप पिंपरकर, प्रियदर्शन शाह, समीर गांधी, नंदकिशोर मुंदडा, अभय सुराणा, सिध्देश्वर जोकारे, जनता बँकेचे विनायक दोनारके उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages