Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज

 सोलापूर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज

शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर : भाजपाच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता पार्टीला सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पुन्हा एकदा फडकवण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते सज्ज आहेत, असे प्रतिपादन भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केले. डफरीन चौकातील सारस्वत मंगल कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या भाजपाच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन रविवारी शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते झाले.


याप्रसंगी व्यासपीठावर भाजपाचे माजी शहर अध्यक्षा रामचंद्र जन्नू, माजी नगरसेविका प्रा. मोहिनी पत्की, सरचिटणीस सुधा अळीमोरे, अंबादास बिंगी, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे, भाजपाचे उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा, साधना संगवे, नागेश सरगम उपस्थित होते.


शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या, भाजपाच्या प्रचार सभांचे नियोजन, मेळावे, सभा, मतदार यादीबाबत मार्गदर्शन अशा सर्व यंत्रणा मध्यवर्ती कार्यालयातून राबविण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात आणि राज्यात प्रवाहित केलेली विकासाची गंगा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहरात आणली आहे. त्यामुळे समस्त सोलापूरकर भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून सोलापूरकरांपर्यंत भाजपाची ध्येयधोरणे, विकासकामे शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी तसेच निवडणूक यंत्रणा सुयोग्य पद्धतीने राबविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असेही शहराध्यक्षा तडवळकर यांनी याप्रसंगी सांगितले.


यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू म्हणाले, सोलापूरच्या जनतेचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपाने ४९ जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत तब्बल १ हजार ३०० जणांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आहे. ज्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाही असे कार्यकर्तेही पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी झोकून देऊन काम करतील. सोलापूरची बकाल झालेली स्थिती भाजपने गेल्या पाच वर्षात विविध विकासकामे करून सुधारली आहे. सुंदर सोलापूरची कल्पना भाजपाच प्रत्यक्षात आणू शकते, असेही जन्नू याप्रसंगी म्हणाले. यावेळी प्रा. मोहिनी पत्की आणि श्रीनिवास दायमा यांनीही मनोगत व्यक्त केले. नागेश सरगम यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.


यावेळी चन्नवीर चिट्टे, शिवानंद पाटील, राम तडवळकर, बजरंग कुलकर्णी, मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे, श्रीहरी म्याकल, आनंद बिर्रु, रामेश्वरी बिर्रु आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments