Hot Posts

6/recent/ticker-posts

इंद्रजित पवार यांचा वाढदिवस लोकोपयोगी व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा

 इंद्रजित पवार यांचा वाढदिवस लोकोपयोगी व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा



शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शेतकऱ्यांना औजारे; पत्रकारांचा सन्मान

उत्तर सोलापूर (कटूसत्य वृत्त) :– भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष इंद्रजित पवार यांचा वाढदिवस उत्तर सोलापूर तालुक्यात विविध लोकोपयोगी, सामाजिक आणि क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील विविध घटकांसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर माडी येथील सार्वजनिक व धार्मिक ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाकड्यांचे वितरण करण्यात आले. शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी शेतकरी गटांना शेतीसाठी उपयुक्त साहित्य व औजारे देण्यात आली.

वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सरपंच क्रिकेट लीग स्पर्धेला विशेष प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत जीपी वॉरियर्स क्रिकेट संघाने प्रथम पारितोषिक पटकाविले, घातक क्रिकेट संघाने द्वितीय, तर एस. राजे क्रिकेट संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

याशिवाय सोलापूर येथील महिला भगिनींनी इंद्रजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची यान्याची तुला करून जमा झालेले सर्व धान्य सोलापूर येथील श्री स्वामी समर्थ समाजसेवी न्यास यांना सुपूर्द करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

बाणेगाव येथे भाजप ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष केदार तोडकरी यांच्या वतीने इंद्रजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ व साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून उत्तर सोलापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या सर्व कार्यक्रमांना भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे, सोसायटी चेअरमन बाबासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते शिवाजी सोनार, काशीनाथ कदम, भाजप तालुकाध्यक्ष संभाजी दडे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विनायक सुतार, किसान मोर्चा अध्यक्ष नागेश ननवरे, गणेश पवार, बाणेगावचे सरपंच पिंटू जाधव, कारंबा गावचे सरपंच तुकाराम चव्हाण, दीपक डांगे, गुळवंचीचे सरपंच सुनील जाधव, नरोटेवाडीचे सरपंच उमेश भगत, कमलाकर माने, दत्तात्रय पवार, अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष अझर शेख, उत्तर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल सुतार, महेश पेंडपाले, युवराज पवार, महादेव जाधव, विश्वनाथ जगताप यांच्यासह तालुक्यातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याची ही परंपरा प्रेरणादायी असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments