कामाचा माणूस गेला; सोलापूरकर भावुक चौकाचौकांत उभारले बॅनर! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 30, 2026

कामाचा माणूस गेला; सोलापूरकर भावुक चौकाचौकांत उभारले बॅनर!

 कामाचा माणूस गेला; सोलापूरकर भावुक चौकाचौकांत उभारले बॅनर!




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरात अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. चौकाचौकांत बॅनर उभारण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे हॉटेल्स, कार्यालये, शाळा व विविध संस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत होती.

अपघातस्थळी पडलेली कागदपत्रे, सोशल मीडियावरील स्टेट्सवर दादांची छायाचित्रे आणि भावनिक शब्दांतून आदरांजली वाहिली. या घटनेच्या शहरभर शोकभावना उमटताना दिसून आल्या.

सोशल मीडियावर अजितदादांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या भावनिक पोस्ट्स व स्टेट्स मोठ्या प्रमाणात शेअर होत होत्या. 'कामाचा माणूस', 'धडाडीचा नेता', 'शब्द थांबले, प्रभाव थांबला नाही', 'महाराष्ट्राचे दादा हरपले', 'एकच वादा अजितदादा' अशा शब्दांत नागरिकांनी आदरांजली वाहिली.

नवी पेठ, रंगभवन, शिवसेना कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणारे बॅनर लावण्यात आले. ख्रिश्चन समाज, आमदार विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, टिळक चौक मित्र परिवार, नगरसेवक अमोल शिंदे, तौफीक पैलवान ताज ग्रुप यांच्यासह विविध संघटनांनी बॅनरद्वारे आदरांजली व्यक्त केली. या घटनेमुळे शहरभर शोककळा पसरली असून, सर्वसामान्यांपासून विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

संपूर्ण राज्याचा अभ्यास असणारा नेता

राजकीय कारकीर्दीत ६ वेळा अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. मात्र महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा विकास, प्रश्‍न यांची जाण असणारा व प्रशासनाकडून लोकधोरणे राबवून घेणारा नेता राजकाराणात एकमेव होता. या कालावधीत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने त्यांचा अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी एकदा मुख्यमंत्रिपादीच संधी मिळायला पाहिजे होती. ही खंत नागरिकांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages