Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रज्ञाशोध परीक्षेत रणजीत सिंह मोहिते पाटील प्रशालेचे घवघवीत यश

 प्रज्ञाशोध परीक्षेत रणजीत सिंह मोहिते पाटील प्रशालेचे घवघवीत यश




 


भोसे (कटूसत्य वृत्त):- भोसे तालुका मंगळवेढा येथील रंजीत सिंह मोहिते पाटील प्रशाला भोसे 2025 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धिवंत प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत संपादन केले असून या प्रशालेची तिसरीतील विद्यार्थिनी ईश्वरी पोप ट महाडिक हे केंद्रात सातवी तर तिसरीतीलच विद्यार्थिनी मृण्मयी दिलीप महाडिक ई केंद्रात 9वी आली याशिवाय अर्णव जयकुमार कदम हा विद्यार्थी केंद्रात प्रथम आला तर इयत्ता चौथीतील तेजस्विनी अविनाश लाडवी या विद्यार्थिनी केंद्रात चौथा क्रमांक पटकावला या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून व ग्रामस्थातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या चारही यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मंगळवेढा येथे जोगेश्वरी मंगल कार्यालयात संपन्न झाला या यशस्वी विद्यार्थ्यांचे रणजीत सिंह मोहिते पाटील विद्यालय भोसे चे अध्यक्ष व सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या चारही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रशालेतील शिक्षक बी एच शिंदे, ए बी लाडवी, उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक रुपेश कुमार खुळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments