नातेपुते येथील महा किड्स मध्ये स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून महा किड्स सी. बी.एस.ई स्कूल नातेपुते येथे प्रथमच राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. लहान गटात अद्विका विशाल फरांदे शिवाजीराजे सी.बी.एस.ई स्कूल फलटण तर मोठ्या गटामध्ये राजनंदिनी विठ्ठल पडर जावली, फलटण यांनी प्रथम क्रमांक पटकवला. स्पर्धेचे विषय स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर आणि राजमाता जिजाऊ असे होते. वयोगट ३ वर्ष ते ७ वर्ष, ८ वर्ष ते १३वर्ष या दोन गटामध्ये घेण्यात आली. स्पर्धेत इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषामध्ये पारितोषिक दिली गेली. तिन्ही भाषांना समान महत्व दिले गेले होते. जो सर्वोत्कृष्ट वक्ता असेल त्याला भाषेनुसार अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक मिळाले.
लहान गट मराठी भाषा प्रथम अद्विका विशाल फरांदे श्रीमंत शिवाजीराजे स्कूल फलटण, हिंदी द्वितीय तुषार सुरेश भुजबळ महा किड्स स्कूल नातेपुते, इंग्रजी तृतीय देवांश विशाल गोरे महा किड्स स्कूल तर उत्तेजनार्थ आनम फैयाज मुलाणी आणि नम्रता गणेश पवार यांना देण्यात आला. मोठा गट मराठी प्रथम राजनंदिनी विठ्ठल पडर जावली फलटण, हिंदी द्वितीय शिवानी नामदेव बोडरे महा किड्स स्कूल, इंग्रजी तृतीय आरुष सुशील गांधी महा किड्स स्कूल तर उत्तेजनार्थ पारितोषिक विराट महेश बंडगर, यांना देण्यात आले.राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे पहिले वर्ष असून सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील ६० स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेची बक्षिसे प्रथम पारितोषिक ट्रॉफी, रु. १००१ आणि प्रशस्तिपत्र, द्वितीय ट्रॉफी, रु. ७०१ आणि प्रशस्तिपत्र, तृतीय ट्रॉफी, रु. ५०१ आणि प्रशस्तिपत्र तसेंच उत्तेजनार्थ बक्षिसे एकूण ४ ठेवण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे फोंडशिरस चे सरपंच पोपट बोराटे, संस्थेचे अध्यक्ष अँड. शिवशंकर पांढरे,अँड.विशाल फरांदे,आणि रत्नत्रय स्कूल चे प्रिन्सिपॉल दैवत वाघमोडे, संचालक निशाताई सरगर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात अँड.शिवशंकर पांढरे यांनी स्पर्धा भरवण्यामागील उद्देश मुलांचा आत्मविश्वास वाढवणे आणि वाचन संस्कृती जपणे हा आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल साळुंखे यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी स्पर्धक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते.
.jpg)
0 Comments