Hot Posts

6/recent/ticker-posts

शंकरराव मोहिते महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने हेरिटेज वॉकचे आयोजन

 शंकरराव मोहिते महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने हेरिटेज वॉकचे आयोजन




अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्यसाधून 'अकलूज हेरिटेजवर वॉक' या अभ्यास सहलीचेआयोजन करण्यात आले होते.
                   विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय,छत्रपती संभाजी महाराज की जय घोषणा देत विद्यार्थी शिवसृष्टी किल्ल्यात पोहोचले.तिथे डॉ.विश्वनाथ आवड यांचे 'अकलूजच्या शिवकालीन ऐतिहासिक स्मृती' या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले.त्यांनी आपल्या व्याख्यानात अकलूजच्या मध्ययुगीन इतिहासाची सखोल मांडणी केली तसेच शिवसृष्टीच्या निर्मितीचा इतिहास त्यांनी विशद केला.त्यानंतर विद्यार्थ्यांना शिवचरित्रातील ऐतिहासिक शिल्पाबद्दलचे मार्गदर्शन करण्यात आले. या हेरिटेज वॉकमध्ये ९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. अकलूज हेरिटेज वॉक यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाचे जेष्ठ प्राध्यापक डॉ.संजय वाघमारे,प्रा.दत्तात्रय मगर,डॉ.सज्जन पवार यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभागातर्फे डॉ.संजय वाघमारे यांनी  यशस्वीरीत्या पुर्ण केला.

Reactions

Post a Comment

0 Comments