पत्रकार समाजाला दिशा देण्याचे काम करतो- डॉ.दत्तात्रय नेटवे
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- पत्रकार हे छातीठोकपणे कोणालाही न घाबरता समाजात वावरत असतात. समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनेचे ते साक्षीदार असतात.घडत असलेल्या घटनेची बातमी करून आपल्या वर्तमानपत्रातून समाजाला दिशा व घडविण्याचे काम पत्रकार करत असल्याचे मत ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन डॉ. दत्तात्रय निटवे यांनी व्यक्त केले.
ते मोरोची तालुका माळशिरस येथील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांच्या सन्मान सोहळा प्रसंगी बोलत होते.
यावेळी ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन डॉ. दत्तात्रय नेटवे, मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील, उपमुख्याध्यापक जिलानी आतार, पत्रकार लतीफ नदाफ, सुनील राऊत, श्रीकांत बाविस्कर, आनंदकुमार लोंढे, मनोज राऊत, समीर सोरटे, विलास भोसले, हनुमंत माने, दत्तात्रय नाईकनवरे हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल प्रशासनाच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनाचे औचित्य साधून सन्मान केला. यावेळी उपस्थित पत्रकारांनी आपली मनोगते व्यक्त करून पत्रकारांच्या कामकाजाविषयी व छापून येणाऱ्या वर्तमानपत्राविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील यांनी केले असून सूत्रसंचालन सुनंदा पवार तर आभार मनीषा सूळ यांनी मानले कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
.jpg)
0 Comments