तडवळे येथे महा रक्तदान शिबीर संपन
कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- तडवळे येथील स्वस्वरूप संप्रदाय कडून महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने तडवळे सेवा केंद्रात महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास तब्बल 241 भक्तांनी रक्तदान करून विक्रम मोडला आहे.या शिबिरास तुगाव,कोंबडवाडी,यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच रुई, गोपाळवाडी यांनी सहकार्य करून रक्तदान वाढवले.या शिबिरास सेवा केंद्र अध्यक्ष रामलिंग सुरवसे,जयसिंग भोईटे,मेजर प्रभाकर गुळवे,युवा अध्यक्ष अशोक देशमुख,भगवान कोळी,राज नाडे,अनिकेत पवार,राज सुरवसे,समाधान पवार,आबा काटवटे,प्रदीप शिंदे,व्यंकटेश सुरवसे,बाळू कोरडे,विकी भोईटे, नवनाथ कदम,गणेश गायकवाड,नितीन पौळ,तसेच तुगाव येथील अशोक लोमटे, लक्ष्मण शेंडगे,कोंबडवाडी येथील मुकुंद सोकांडे,रामलिंग मिसाळ व भक्त गण यांनी परिश्रम घेतले.

0 Comments