नरखेड येथे निरामय क्लिनिक चे उद्घाटन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- नरखेड आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी डॉ.राधा पाटील -मिरगणे यांच्या निरामय क्लीनिकचे उद्घाटन मोहोळ तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.शैलेश झाडबुके यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
ग्रामीण भागातील नागरिक बऱ्याचदा आजार अंगावर काढण्याचा प्रयत्न करतात,खास करून स्त्रियांना त्यांचे आजारपण खुलेपणाने मांडण्यासाठी महिला डॉक्टरांची आवश्यकता असते आणि ती सोय डॉ. राधा पाटील- मिरगणे यांनी उपलब्ध करून सेवा देण्याचा जो निर्णय घेतला त्याचे डॉ. शैलेश झाडबुके यांनी कौतुक केले.
यावेळी डॉ. प्रमोद पाटील म्हणाले की अनेक वेळा रुग्ण त्यांचे आजारपण जास्त वाढल्यानंतर डॉक्टरांकडे येतात आणि दुर्दैवाने पेशंटची तब्येत जास्तच बिघडली की त्याचे आरोप डॉक्टर वरती केले जातात तसे न करता वेळीच उपचार करून घेणे आवश्यक असते. डॉक्टर सुद्धा माणूसच असतो त्याच्याशी वाद घालणे किंवा दवाखान्याची तोडफोड करणे गैर असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.मिलिंद लामगुंडे ,डॉ.उमेश मेंडगुळे ,डॉ. अमोल पाटील ,डॉ. शुभम चौधरी, डॉ. सुबोध जोशी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन प्रसंगी नरखेड आणि परिसरातील अनेक मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते विनायकराव पाटील (बार्शी) ,तानाजीराव दळवी (यावली),विक्रमराव देशमुख (परळी वैद्यनाथ), किशोर इंगळे सर (वैराग),रघुनाथ मिरगणे, रमेश मिरगणे, ओंकार मिरगणे (केवड) ,विश्वनाथराव देशमुख (तेरढोकी) ,मल्लिकार्जुन क्षीरसागर (मुंगशी),नजीर शेख (मोहोळ) आदी मान्यवर उपस्थित होते नरखेड मधील ग्रामस्थांमध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष उत्तम मोटे, कोल्हाळ सर,जयवंत पाटील सर, दिलीप पाटील, राजू पाटील, माजी सरपंच विनोद पाटील, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.
उद्घाटन समारंभ पार पाडण्यासाठी प्रकाश पाटील सर,ओंकार पाटील,सुधीर पाटील,श्रीकांत पाटील विलास पाटील, अविनाश पाटील, आणि जहिरुद्दीन पठाण सर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नरगीडे यांनी केले.आणि आभार प्रा. शिवराज पाटील यांनी मानले.

0 Comments