Hot Posts

6/recent/ticker-posts

परराज्यातील चोरटे अकलूज पोलिसांच्या जाळ्यात

 परराज्यातील चोरटे अकलूज पोलिसांच्या जाळ्यात



 
अकलूज (कटूसत्य वृत्त):- संशयीतांचे सीसीटिव्ही फुटेज आणि फुटेज मध्ये चार चाकी वाहनाचा नंबर प्राप्त होताच,अकलूज पोलिसांनी पोलिसी चक्रे फिरवत, चोरी करणारी परराज्यातील टोळीच्या मुसक्या आवळत त्यांना जेरबंद केले.
       अकलूज पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहिती नुसार,फिर्यादी आनंद हणुमंतराव भोसले रा. यशवंतनगर ता. माळशिरस यांनी,  संयुक्तानगर, यशवंतनगर येथील बी. एस. कंस्ट्रक्शनचे ऑफीसचे ड्रॉवर मधील ५,४५,००० रुपये रोख रक्कम ही कोणीतरी,अज्ञात चोरटयाने चोरुन नेली असल्याची  फिर्याद दिली. अकलुज पोलीस ठाणे गु.र.नं. ८४७/२०२५ भा.न्या. सं. कलम ३०५ (a), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केली.
 सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा अकलुज पोलीस ठाणेकडील तपास पथक,पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांचे नेतृत्ताखाली शोध घेऊ लागले. शोध घेत असताना अकलुज पोलीस ठाणेकडील, पोलीसाना घटनेच्या ठिकाणी, काही संशयीताचे सीसीटिव्ही फुटेज प्राप्त झाले होते. सदरचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये एक चार चाकी वाहनाचा नंबर प्राप्त झाला तो नंबर व संशयीताचे फुटेज संपुर्ण देशातील पोलीसाचे वेगवेगळ्या व्हॉटसअॅप ग्रुपवर पाठविण्यात आलेले होते.

सापुतारा पोलीस ठाणे राज्य गुजरात, यांना देखील सदरचे फुटेज पाठविण्यात आलेले होते. सापुतारा पोलीस ठाणे हददीत नाकांबदी दरम्यान, तीन संशयीत इसम मिळुन आल्याने व सीसीटिव्ही फुटेज मधील वाहन व इमस हे सदर इमसाशी मिळते जुळते असल्याने, सापुतारा पोलीस ठाणे यांनी अकलुज पोलीस ठाणे येथे संशयीता बाबत कळविले.
           त्याप्रमाणे त्वरित पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक सो. ग्रा. यांचे आदेशान्वये पोसई कदम व तपास पथक सापुतारा येथे रवाना झाले. आरोपी  अनिलभाई रेवाभाई भांभोरे वय २७ वर्षे, मिथुनभाई रेवाभाई भांभोरे वय ३४ वर्षे दोघे रा. नाडेलगांव धुळ महोडी फलिया, ता. गरबाडा, जि. दाहोद राज्य गुजरात, वकील तेजसिंग भांभोरे वय ३२ वर्षे रा. अंबाली खजुरीया शिमोडा, फलिया, ता. गरबाडा, जि. दाहोद राज्य गुजरात यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास पथकाने तपास केला असता, आरोपीनी सदरचा गुन्हा अकलुज येथे केलेली कबुली दिली.
 सदर गुन्हयात चोरी केलेला एकुण ५,४५,०००रु/- रक्कमे पैकी ५,१३, १८० रु/- हस्तगत केली असुन गुन्हा करताना वापरलेले वाहन हुंडाई केटा, कार क्रमांक GJ-20CB-2646 जप्त केलेले आहे.
सदर आरोपीना ताब्यात घेवुन अकलुज पोलीस ठाणे येथे आणुन त्यांची ५ दिवस पोलीस कोठडी न्यायालयाकडुन मंजुर करुन घेत,आरोपीकडे अधिकचा तपास केला असता, यांनी अश्याच प्रकारे सांगोला पोलीस ठाणे हददीत चोरी केल्याची कबुली दिली. त्या गुन्हयात चोरी केलेल्या चांदीचा मुददेमाल देखील आरोपी कडुन जप्त करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयातील आरोपीनी गुन्हा करताना वापरलेली वाहन हुंडाई केटा कार क्रमांक GJ-20CB-2646, तीन मोबाईल, एक लोखंडी कटावणी, एक काळया रंगाची बॅग, एक लोखंडी पक्कड असे एकुण २०,३६,६८०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज संतोष वाळके, पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांचे मार्गदर्शनाखाली,गुन्हे प्रकटीकरण शाखा अकलुजचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम व पो. हवा. विक्रम घाटगे, पो. हवा. विनोद साठे, पो. हवा. सुहास क्षिरसागर, पो. हवा. शिवकुमार मदभावी, पो. हवा. आभिजीत कुंभार, पो.कॉ. रणजित जगताप, पो. कॉ. दत्तात्रय खरात, पो.कॉ. सोमनाथ माने, पो.कॉ. पंडीत गवळे तसेच सायबरचे पो. हवा. तांबोळी यांनी कामगिरी केली आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम हे करीत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments