Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते - पिरळे रोड डांबरीकरण होणे बाबत सामाजिक कार्यकर्ते विनायक सावंत यांचे अन्नत्याग आंदोलन

 नातेपुते - पिरळे रोड डांबरीकरण होणे बाबत सामाजिक कार्यकर्ते विनायक सावंत यांचे अन्नत्याग आंदोलन




नातेपुते (कटूसत्य वृत्त):-नातेपुते - पिरळे रोड हा पहिला डांबरीकरण रस्ता होता नंतर काही कालांतराने रस्ता खराब झाल्याने तो रस्ता दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करून त्याच्यावरती एक वर्षांपूर्वी खडीकरण व बीबीएम करण्यात आले. मात्र अद्याप त्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले नाही. तो रस्ता डांबरीकरण व्हावा यासाठी नातेपुते येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक सावंत यांनी आज सोमवार दि. ५ जानेवारी २०२६ पासून जोपर्यंत रस्ता डांबरीकरण होत नाही तोपर्यंत त्या रस्त्याजवळ अन्य त्याग आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विनायक सावंत यांनी स्वराज्यशी बोलताना दिली.
         नातेपुते - पिरळे रोड हा पहिला डांबरीकरण रस्ता होता नंतर काही कालांतराने रस्ता खराब झाल्याने तो रस्ता दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करून त्याच्यावरती एक वर्षांपूर्वी खडीकरण व बीबीएम करण्यात आले. अनेक वेळा कार्यकारी अभियंता सुनिता पाटील यांना निवेदनाद्वारे लेखी पत्राद्वारे कळवून देखील त्या पत्रावर किंवा त्या रस्त्याच्या डांबरीकरण दुरुस्तीसाठी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काम  पूर्ण करतो असे लेखी पत्र कार्यकारी अभियंता यांच्याकडून विनायक सावंत यांना प्राप्त झाले होते.  परंतु अध्याप त्या रस्त्या संदर्भात डांबरीकरणाचे काम झाले नाही परंतु सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत डांबरीकरण करण्यासाठी लागणाऱ्या मशनरी रस्त्यापासून काही अंतरावर पालखी मैदान येथे लावण्यात आले आहेत. नातेपुते व पेरळे रस्त्यावर दोन मोठ्या इंग्लिश मीडियम शाळा आहेत. तसेच साईराज भांड यांची भारत गॅस एजन्सी आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी, पालक शाळेसाठी व अनेक नागरिक त्या रस्त्याने गॅस एजन्सीकडे गॅस आणण्यासाठी येत - जात असतात. त्यामुळे त्या रस्त्याने अनेक नागरिक विद्यार्थी व येणऱ्या- जाणाऱ्या तेथील लोक वस्तीतील लोकांना त्या रस्त्याचा नाहक त्रास होऊन अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून डांबरीकरण नसल्यामुळे खडीकरणावरून अनेक वेळा  दोन चाकी वाहन खडीकरणामुळे घसरून त्या रस्त्यावरून अपघात घडले आहेत. अनेक नागरिकांचीही मागणी आहे गेले एक वर्षापासून नुसते खडीकरण केल्याने त्या रस्त्यावरून ये जा करत असताना नागरिकांना त्या रस्त्याचा नाहक त्रास व रस्त्यावरून उडणाऱ्या मातीच्या फुफुट्याला सामोरे जावे लागत आहे. तेथील अनेक नागरिकांनी नातेपुते येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक सावंत यांना रस्ता दुरुस्ती संदर्भात वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यांनीही अनेक वेळा पाठपुरावा करून देखील सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणतेही रस्त्या संदर्भात दखल घेतली नाही. त्या अनुषंगाने सोमवार दि. ५ जानेवारी २०२६ पासून जोपर्यंत रस्ता डांबरीकरण होत नाही तोपर्यंत त्या रस्त्याजवळ अन्य त्याग आंदोलन सुरू करण्यात येणार असून त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनासाठी छोटासा मांडव टाकण्यात आला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments