Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; मोटरसायकलवरील तिघांचा मृत्यू

 पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; मोटरसायकलवरील तिघांचा मृत्यू


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे वेणेगाव शिवारात पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर आज रविवार (दि. ४ जानेवारी २०२६) रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या केमिकल टँकरने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकलवरील एक पुरुष व दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. मृतांना उपचारासाठी टेंभुर्णी येथील मार्स मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

अपघातातील केमिकल टँकर क्रमांक TS 30 T 3366 हा पुण्याकडून सोलापूरकडे जात असताना, समोरून येणाऱ्या होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MH 39 E 6778 ला वेणेगाव ब्रिजजवळ धडक दिली. टँकर चालक बरकतआली मौलाआली शेख (वय २५, रा. जळकोट, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे चालकाचे नाव आहे. मोटरसायकलवरून पंढरपूरकडून नंदुरबारकडे जाणारे मीरा राज्य भील (वय ३८), पायल मीरा भील (वय १५) व खारकी मीरा भील (वय २६, सर्व रा. कोटबंधनी, पोस्ट रायपूर, ता. शहादा, जि. नंदुरबार) हे वेणेगाव फाट्याजवळ महामार्ग ओलांडत असताना अपघात घडला. अपघातात तिघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णवाहिकेद्वारे टेंभुर्णी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तसं तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  पो.ह. जगताप तपास करीत आहेत

Reactions

Post a Comment

0 Comments