Hot Posts

6/recent/ticker-posts

ब्रह्मांड कट्टा परिवाराचा लिटिल स्टार अर्णव बोपालकर मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद मध्ये अव्वल

 ब्रह्मांड कट्टा परिवाराचा लिटिल स्टार अर्णव बोपालकर मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद मध्ये अव्वल




ठाणे (कटूसत्य वृत्त):-ठाणे नगरीतून ब्रह्मांड स्थित ब्रह्मांड संगीत कट्टयाचा कु. अर्णव बोपलकर, वय वर्षे 11, याची "मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद" या स्टार प्रवाह वाहिनीवरील छोट्यांच्या मोठ्या गायन स्पर्धेत 5000 स्पर्धांमधून निवड झाली असून 3 जानेवारी 2026 रोजी त्याचा पहिला एपिसोड टी.व्हि. वर प्रदर्शित झाला. त्याने पहिल्याच परफॉर्मन्स मध्ये सर्व महागुरूंची मने तर जिंकलीच पण त्याला अक्टिंग, डान्सिंग अँड सिंगिंग चे बादशाह म्हणजेच मराठी/हिंदी सीने क्षेत्रातील आपले सर्वांचे लाडके अभिनेता सचिन पिळगावकरजी यांनी त्तिथेच त्यांच्या सिनेमात काम करण्यासाठी आणि गाणे गाण्यासाठी ऑफर दिली. तसेच आपले दुसरे गुरू ज्यांच्याकडे संगीता चे वैभव राज्य करते अशा वैशाली सामंत जी आणि शिंदे शाहीचा वारसा चालवणारे महाराष्ट्रच लाडके बुलंद आवाजाचे आदर्श शिंदे जी यांनी पण अर्णवला खूप खूप आशीर्वाद देऊन त्याचे खूप कौतुक केले. असा हा आपला ठाण्याचा हरहुनरी अष्टपैलू गायक अर्णव बोपलकर याला प्रत्येक शनिवार- रविवारी,स्टार प्रवाह वाहिनीवर पहायला विसरू नका असे आवाहन ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments