अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान रॅली; सुमेद पोतदार रॅलीतील आकर्षण
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते एज्युकेशन सोसायटी नातेपुते संचलित प्राथमिक विभागाच्या वतीने संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत इ.१ ली ते ४ थी पर्यंतच्या ४२५ विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. मात्र या रॅलीमध्ये इ.१ लीतील विद्यार्थी सुमेद पोतदार याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पेहराव करून या रॅलीतील आकर्षण बनला होता. त्याने केलेल्या पेहरावामुळे अनेकांची मने जिंकली. अनेक विद्यार्थ्यांनी भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील वेषभूषा परिधान केल्या होत्या. संविधानातील समतेची मुल्य जोपासने व भारतीय संस्कृतीचे दर्शन या पेहरावात दिसून आले. विद्यार्थी संविधानाची उद्देशिका व घोष वाक्य बॅनर हातात घेऊन घोषणा देत होते. रॅली शाळेच्या प्राथमिक विभागापासून सुरु होऊन शहरातील संविधान चौकात पोहचली त्या ठिकाणी नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे सचिव अँड. शिवाजीराव पिसाळ संस्थेचे उपाध्यक्ष संतोष काळे यांनी संविधान स्मारकाचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले त्यानंतर संविधान रॅली नातेपुते येथील बस स्थानकासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पोहोचली यावेळी नातेपुते पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने, अॅड. शिवाजीराव पिसाळ, संतोष काळे, एन.के. साळवे, सुनिल साळवे, जिवनदास सोरटे, श्रावण सोरटे, बंटी सोरटे, सागर बिचुकले, नवाज सोरटे, प्रकाश साळवे, दत्ता सोरटे, विशाल साळवे, इमाम मुलाणी, प्रा.राकेश सोरटे, प्रा. राजेंद्र खरे, छगन मिसाळ, शिवाजी सावंत, संजय साळवे, बाळासाहेब जाधव, मामा बनसोडे आदी उपस्थित होते. प्राथमिक विभागाचे सहशिक्षक अक्षय इंगोले यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. रॅलीसाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक कुंडलिक इंगळे, अभिजीत वाळके, दादासाहेब देवकते, मारुती भांगरे, सहशिक्षिका कुंभार, बडवे आदिसह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

0 Comments