Hot Posts

6/recent/ticker-posts

संग्रामनगर शाळेच्या कला तरंग स्नेहसंमेलनात बालकलाकारांनी चढविला रंग

संग्रामनगर शाळेच्या कला तरंग स्नेहसंमेलनात बालकलाकारांनी चढविला रंग



अकलूज (कटूसत्य वृत्त):- श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर ता. माळशिरसच्या "कला- तरंग" या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाट्न अकलूज नगरपरिषदचे नुतन नगरसेवक सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते स्मृतिमंदिर अकलूज येथे संपन्न झाले.
   यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे संचालक सुभाष दळवी, प्रशाला समिती सभापती निशा गिरमे, सदस्य महादेव अंधारे, यशवंत साळुंखे, उज्वलाताई अडाणे, विस्ताराधिकारी नाचणे मॅडम, उपसरपंच सुदेश रासकर, मुख्याध्यापक मल्हारी घुले, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक गणेश करडे आदी उपस्थित होते.

   सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर प्रशालेतील विद्यार्थी विनायक इंगळे- बालक्रीडा स्पर्धा, हिंदवी देवशेटे-वक्तृत्व स्पर्धा, सोनाक्षी माने- नॅशनल तायक्वादो स्पर्धा,ईशा साठे- विभागीय क्रीडास्पर्धा, अद्विक बनपटटे- राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा, संयोगिता माने इंग्रजी वक्तृत्व,पिकेएम समूहनृत्य स्पर्धा, संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ राज्यस्तरीय लेझीम स्पर्धा मुली प्रथम,मुले द्वितीय क्रमांक अशा गुणवंत विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.
     सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये  पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभागांतील विद्यार्थ्यांनी विविध १८ गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची  मने जिंकली.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मल्हारी घुले यांनी केले तर सुत्रसंचलन गणेश करडे,आरती दोरकर, विश्वनाथ हलकुडे या शिक्षकांनी तसेच  सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन संयोगिता माने, अद्विक बनपट्टे, सिद्धेश्वर स्वामी, आनम शेख, श्रेया ढोबळे या विद्यार्थ्यांनी  केले. आभार सुभाष चव्हाण यांनी   मानले.
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कविता कुलकर्णी, राणी गोरे, वैभवी बोदडे, शुभांगी कदम, शाहीनबानू काझी,रोहिणी गायकवाड, सहशिक्षक सुरेश माने, संतोष कदम, महेश शिंदे, रविंद्र कवटे, सतिश एकतपुरे,गणेश म्हसवडे,अशोक व्यवहारे, सुनील काळे या शिक्षकांसह विद्यार्थी- पालक यांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.



Reactions

Post a Comment

0 Comments