नाळेवस्ती शाळेस पालकांकडून नववर्षाची अनोखी भेट
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळेवस्ती या शाळेसनाळेवस्ती वेणेगाव चे प्रसिद्ध बागायतदार संतोष नाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एलईडी टीव्ही भेट दिला. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि मराठी शाळा टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणेगरजेचे आहे ही गरज ओळखून त्यांनी वाढदिवसानिमित्त शाळेला ही नववर्षानिमित्त अनोखी भेट दिली.
यावेळी शाळेत मुख्याध्यापक सुमन कुटे मॅडम, रणजीत नाळे ,केलास नाळे,सुशिलकुमार नाळे ,रतन खोटे उपस्थित होते. सर्वांनी दादांचे या सहकार्याबद्दल आभार मानले व समाजातील इतर घटकांनीही प्रेरणा घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली.

0 Comments