प्रजासत्ताक दिन समारंभ नियोजन पुर्व बैठक संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 20, 2026

प्रजासत्ताक दिन समारंभ नियोजन पुर्व बैठक संपन्न

 प्रजासत्ताक दिन समारंभ नियोजन पुर्व बैठक संपन्न



 

 

     पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 76 व्या वर्धापन दिन सोमवार दि.26 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात येणार असून,  शासकीय ध्वजारोहण समारंभाचा कार्यक्रम रेल्वे मैदानपंढरपूर येथे घेण्यात येणार आहे. यासाठी दरवर्षी प्रमाणे प्रत्येक विभागाला दिलेली जबाबदारी संबधित विभागांनी यशस्वीपणे पार पाडावी अशा सूचनातहसिलदार सचिन लंगुटे  यांनी दिल्या.

        प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व तयारीबाबत तहसील कार्यालय पंढरपूर येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीस मुख्याधिकारी महेश रोकडेनायब तहसिलदार बालाजी पुदलवाड, संबधित विभागाचे अधिकारी तसेच पंढरपूर शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापकशिक्षक उपस्थित होते.

            यावेळी तहसिलदार लंगुटे म्हणालेप्रत्येक विभागाकडे कार्यक्रमासंबंधीची जबाबदारी दिलेली असते त्या अनुषंगाने ती यशस्वीपणे पार पाडावी. सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका प्रशासनाने  मैदान स्वच्छ करुनदगड व खडी काढूनपाणी टाकून रोलींग करावे.तसेच शुध्द पिण्याच्या पाण्याची  व अग्निशमन व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने वैद्यकीय पथकासह सुसज्ज रुग्णवाहिका व प्रथमोपचार व्यवस्था उपलब्ध ठेवावी. उपस्थित मान्यवरांची बैठक व्यवस्था,विद्युत व्यवस्था आदीबाबतची व्यवस्था संबधित विभागाने करावी अशा सूचनाही तहसिलदार लंगुटे यांनी यावेळी दिल्या.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages