श्री भगवती गौरीमाता प्रशालेचे चित्रकला परीक्षेत शंभर टक्के निकाल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील श्री भगवती गौरीमाता प्रशालेचे शासकीय रेखाकला परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला.एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत सर्व ३७ विद्यार्थी तर इंटरमिडीएट ग्रेड परीक्षेत सर्व २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.सर्वच ६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. एलिमेंटरी परीक्षेत १५ विद्यार्थी अ श्रेणीत तसेच इंटरमिडीएट परीक्षेत ११ विद्यार्थ्यांनी अ श्रेणीत उत्तीर्ण झाले.पहिल्यांदाच शाळेतील २६ विद्यार्थ्यांनी अ श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने शाळेने विक्रम केला .या सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक श्री संजय पाटु सर यांचे मार्गदर्शन लाभले.प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गिरमल बुगडे सर, पर्यवेक्षक श्री देगावकर सर , सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले.

0 Comments