Hot Posts

6/recent/ticker-posts

मांडवे येथे अल्टो व टेम्पोच्या अपघातात तीन जखमी एक ठार

 मांडवे येथे अल्टो व टेम्पोच्या अपघातात तीन जखमी एक ठार




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- ४६ फाटा मांडवे तालुका माळशिरस पुणे पंढरपुर हायवे रोडवरील मांडवे पाटीचे पुलाच्या सर्विस रोड येथे मारुती अल्टो व आयशर  टेम्पोच्या अपघातात तीन जण जखमी तर एक जन ठार झाले आहे.
     पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार
वसंत पांडुरंग शिंदे वय ६० वर्ष हे शुक्रवार दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास साक्षी अमर शिंदे वय २१ वर्ष व त्यांचा लहान मुलगा देवांष अमर शिंदे वय २२ महिने , बेबी वसंत शिंदे वय ४५ वर्ष यांना मारुती अल्टो गाडीनंबर एम. एच.१३ ए झेड ८३०८ मध्ये सोबत घेऊन ४६ फाटा मांडवे तालुका माळशिरस पुणे पंढरपुर हायवे रोडवरील मांडवे पाटीचे पुलाच्या सर्विस रोडणे नातेपुते येथे जात असताना पुणे कडुन एक चॉकलेटी रंगाचा आयशर कंपनीचा टेम्पो क्र. के.ए.२८ ए.ए.३०८७ याचे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन रस्त्याचे परिस्थितीतकेडे दुर्लक्ष करुन, हयगयीने अविचाराने चालवुन समोरुन धडक दिल्याने सदर अपघात झाल्याबाबत निलेश सुरेश शिंदे वय ३८ वर्ष धंदा व्यापारी राहणार मांडवे तालुका माळशिरस यांनी नातेपुते पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असून या अपघातामध्ये वसंत पांडुरंग शिंदे,साक्षी अमर शिंदे, देवांष अमर शिंदे हे जखमी झाले असून बेबी वसंत शिंदे अपघातात ठार झाल्या आहेत. अपघाताची माहिती नातेपुते पोलीस ठाण्यास समजतास नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे हे पोलीस कर्मचारी  घेऊन घटनास्थळी पोहोचले असता अपघातातील जखमींना नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. अपघातास कारणीभूत असलेला चॉकलेटी रंगाचा आयशर कंपनीचा टेम्पो क्र. के.ए.२८ ए.ए.३०८७ चा चालक अपघात झाल्यास त्या ठिकाणाहून पळून गेला असून हेड कॉन्स्टेबल बाबर अपघाताचा पुढील तपास करीत आहेत.


Reactions

Post a Comment

0 Comments