Hot Posts

6/recent/ticker-posts

शासकीय रेखाकला परीक्षेत एस.व्ही.सी.एस. प्रशालेचा शंभर टक्के निकाल

 शासकीय रेखाकला परीक्षेत एस.व्ही.सी.एस. प्रशालेचा शंभर टक्के निकाल





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कला संचालनालय मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत एस. व्ही. सी. एस. एम.आय.डी.सी. येथील प्रशालेने यशाची परंपरा कायम ठेवली असुन प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.         
प्रशालेतील 72 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 19 विद्यार्थी 'ए' ग्रेड, 27 विद्यार्थी 'बी' ग्रेड व 26 विद्यार्थी 'सी' ग्रेड प्राप्त करत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना कला शिक्षक पंडित स्वामी यांचे  मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे, उपमुख्याध्यापक धनंजय नकाते व पर्यवेक्षक संतोषकुमार तारके यांनी अभिनंदन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments