मराठी पत्रकार संघाच्या शहराध्यक्षपदी सर्वगोड यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 6, 2026

मराठी पत्रकार संघाच्या शहराध्यक्षपदी सर्वगोड यांची निवड

 मराठी पत्रकार संघाच्या शहराध्यक्षपदी सर्वगोड यांची निवड 




पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.3 जानेवारी2026रोजी ठिक 11/30वाजता प्रथम श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व त्यांना अभिवादन करून मराठी पत्रकार संघाच्या नूतन पंढरपूर कार्यकारणी निवडीबाबत येथील पत्रकार भवन येथे बैठक पार पडली.
यामध्ये मराठी पत्रकार संघाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी दैनिक एकमतचे तालुका प्रतिनिधी अपराजित सर्वगोड तर तालुका अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे मिलिंद यादव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या वेळी शहर व तालुक्यातील पत्रकारांची मराठी पत्रकार संघाच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली.असून पंढरपूर येथे उभारण्यात येणाऱ्या मीडिया टावर, पत्रकारांच्या अडचणी समस्या सोडवण्या बाबत तसेच विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. 
मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारणी मध्ये शहर उपाध्यक्ष अमोल माने,दगडु कांबळे, शहर सचिव दत्ता पाटील, शहर कार्याध्यक्ष रामकृष्ण बिडकर, शहर खजिनदार सचिन माने, शहर प्रसिद्धी प्रमुख कबिर देवकुळे यांची निवड करण्यात आली तर पंढरपूर तालुका उपाध्यक्ष बालम मुलानी, तालुका कार्याध्यक्ष अमोल कुलकर्णी, तालुका सचिव अरुण जाधव, तालुका खजिनदार सावता जाधव, तालुका प्रसिद्धीप्रमुख विनोद पोतदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ शहापूरकर, पत्रकार कल्याण कुलकर्णी, विकास पवार, संजय कोकरे, राजेंद्र ढवळे, सागर आतकरे, नवनाथ खिलारे, अमोल गुरव, नेताजी शिंदे, संतोष चंदनशिवे, प्रकाश सरताळे, संतोष कसगावडे, संजय यादव, प्रदीप आसबे यांच्यासह मराठी पत्रकार संघाचे पत्रकार बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages