पुर्व जन्म आणि पुनर्जन्म मानणारे लोकच अस्तिक असतात- आचार्य सुरिश्वरजी महाराज
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माणसाने आपले नित्य कर्म चांगले करावे जेणेकरून त्याला सद्गती प्राप्त होईल आणि जो पुर्व जन्म आणि पुनर्जन्म होऊ शकतो याला मान्यता देतो तोच अस्तिक असतो असे मत त्यांनी व्यक्त केले.
कारंबा टोळ नाक्याजवळ असलेल्या सुप्रसिद्ध अहिंसा गो शाळेला त्यांनी भेट दिला होता. त्यांच्यासोबत चार आचार्य 26 जैन श्रमण आणि 19 साध्वी यांच्यासह त्यांनी गोशाळेत आगमन केला. ज्यामध्ये सोलापूरचे रत्न आज पासून 31 वर्षापूर्वी सीए चा अभ्यास करून दीक्षा घेतलेले श्री रत्न यश विजयजी महाराज यांचाही आज आगमन झालेलं होतं.
या सर्वांचे अहिंसा गोशाळेचे सर्व डायरेक्टर्स यांनी स्वागत केलं व्याख्यानाला सोलापुरातील प्रथित यश व्यापारी मित्रपरिवार आणि नागरिक बहुसंख्या प्रमाणात उपस्थित होते.
सर्वप्रथम सोलापूरचे श्री रत्न्यास प्रवर श्री रत्न यश विजयजी महाराज यांनी आपल्या प्रवचनात म्हणाले की खूप सुंदर दिसणारे हे संसार वास्तवामध्ये खूप भयावह असते ते सुंदर करण्यासाठी आपण नामस्मरण करण्याची गरज असून एक दिवस शरीर नष्ट होणार आहे संपत्ती भरपूर गोळा करून काहीही उपयोग होत नाही तेव्हा धर्माची आराधना करून दान धर्म करण्यावर भर द्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रबुद्ध आचार्य यांनी म्हटले की आम्ही काही दिवसच सोलापुरात आहोत. तुमच्याबरोबर वार्तालाप करायला आलेलो आहे. तेव्हा तुम्ही पुर्व जन्म पुनर्जन्मावर विश्वास ठेवत असेल तर तुम्ही आपले कर्म चांगले व्यतीत करा आणि त्याचे फळ चांगले भोकता येईल याची काळजी घ्या असे त्यांनी आपल्या प्रवचनातून आलेल्या भक्तांना समजावून सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उत्तम चौधरी, चेतन संघवी, किरीट शहा, स्वप्नील मुनोत, योगेश मेहता, विशाल चोरलिया, विनित शहा, धीरज संघवी, विकास मखाना, राजेश झाबक, दिलीप संकलेचा, नवरतन संकलेचा, अभय सेठिया, नितीन वेद यांनी प्रयत्न केले.
.png)
0 Comments