इंग्रजी ही देश विदेशातील माणसे जोडणारी भाषा- प्रा डॉ दीपक ननवरे
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- आधुनिक जगात प्रभावी आणि व्यापक संवादाची भाषा म्हणून इंग्रजी भाषा ओळखली जाते विविध देशांतील लोकांना एकमेकांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य इंग्रजी भाषेने केले आहे. त्यामुळे इंग्रजी भाषा ही जागतिक एकात्मतेचे प्रतीक बनली आहे. असे प्रतिपादन दयानंद महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ दीपक ननवरे यांनी केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील इंग्रजी विभागाने आयोजित केलेल्या इंग्रजी भित्तिपत्रकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ सुरेश ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रा डॉ अनिलकुमार वावरे, संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्राचार्य डॉ एस आर लोखंडे, प्रा डॉ विरभद्र दंडे, जूनियर विभाग प्रमुख पुनम कोकळगी मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
डॉ दंडे म्हणाले की, उच्च शिक्षण, संशोधन, स्पर्धा परीक्षा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक असते. अनेक महत्त्वाची पुस्तके, संदर्भ साहित्य आणि संशोधन कार्य इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्यामुळे ज्ञानसंपादन अधिक सुलभ होते. इंग्रजी भाषा शिकल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.
प्राचार्य डॉ ढेरे म्हणाले की,करिअरच्या दृष्टीने बहुराष्ट्रीय कंपन्या, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र, माध्यमे, पर्यटन आणि सेवा क्षेत्रात इंग्रजी संवाद कौशल्याला मोठी मागणी आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा राजशेखर पवार यांनी केले, आभार समर्थ पवार यांनी मानले.
भित्तिपत्रकामध्ये संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन जगप्रसिद्ध इंग्रजी लेखकांचे कार्य संकेत पुजारी,
रविराज कुलकर्णी, समर्थ पवार, पंचप्पा जाधव, पवन अंबुरे, आकाश कोकरे, शकुंतला कोरे, पायल कांबळे यांनी अधोरेखित केले.
चौकट-
विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत करावे.
तंत्रज्ञान आणि डिजिटल युगात इंटरनेट, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच जगातील घडामोडी समजून घेण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान विद्यार्थ्यांनी अवगत केली पाहिजे. असे मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
.png)
0 Comments