ॲड. क्रांती महाजन-कानून, कलम और कर्तव्य का प्रखर आलोक'
या पुस्तकाचे राष्ट्रीय स्तरावर भव्य प्रकाशन संपन्न
नागपूर (कटूसत्य वृत्त):- देशातील कीर्तिमान विद्वान लेखक, विचारवंत आणि प्रख्यात अधिवक्ता ॲड. क्रांती महाजन यांच्या आतापर्यंतच्या संघर्षमय जीवनप्रवासावर, शौर्य, कर्तृत्व, वैचारिक निष्ठा तसेच प्रतिभावान व असाधारण व्यक्तिमत्त्वावर आधारित जीवनचरित्र (बायोग्राफी) ग्रंथाचे ऐतिहासिक व राष्ट्रीय स्तरावरील भव्य प्रकाशन महाराष्ट्र राज्याची उप-राजधानी नागपूर येथे एका विशाल, ऐतिहासिक व अत्यंत गौरवशाली समारंभात पार पडले. मुंबई स्थित नीलम प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे लेखन उत्तराखंड येथील महाराजा अग्रसेन गढवाल विद्यापीठाच्या पीएच.डी. इतिहासतज्ज्ञ व लेखिका डॉ. रूपाली वशिष्ठ यांनी केले आहे. या विशेष प्रसंगी नागपूरचे महाराज श्रीमंत मुधोजीराजे भोसले, वीरशिरोमणी तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे, उत्तर प्रदेशचे संस्कृती मंत्री यशवंत निकोसे, सिक्कीम पर्वतीय शृंखलेतील थोर साहित्यिक टी. बी. चंद्र सुब्बा, भारत सरकारच्या पंचायत राज अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष दयाराम राय (झांसी), हिंदुस्तान स्काऊट गाईडचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राकेश कुमार मिश्रा (रायपूर), आध्यात्मिक गुरू स्वामी डॉ. शिवानंदजी, प्रधानमंत्री जनकल्याण योजनेचे प्रमुख रविंद्र ठाकूर (म.प्र. शासन), प्रख्यात राजनीतीज्ञ व समाजसेवक चंद्रपाल चौकसे, डॉ. प्रदीपकुमार टंडन (प्रयागराज), युधिष्ठिर राणा (शिमला), डॉ. दिगंबर तायडे (मुंबई), प्राचार्य डॉ. दिलीपकुमार लालवानी, प्रा. डॉ. पी. आर. रोकडे, डॉ. नरेंद्र रोंघे, महेंद्र डोहरे, राजाभाऊ उंबरकर तसेच लेखिका डॉ. रूपाली वशिष्ठ यांच्यासह अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे राष्ट्रीय स्तरावर विधिवत प्रकाशन करण्यात आले. या गौरवशाली सोहळ्यास देशातील सर्व राज्यांतून हजारो मान्यवर नागरिक, विद्वान, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘ॲड. क्रांती महाजन कानून, कलम और कर्तव्य का प्रखर आलोक’ या पुस्तकामध्ये लेखिका डॉ. रूपाली वशिष्ठ यांनी ॲड. क्रांती महाजन यांच्या जीवनाचा वेध राष्ट्रजीवनाला नवा प्रकाश देणारे व्यक्तिमत्त्व , चारित्र्यनिर्मितीचे अग्रदूत, भारतीय गौरवशाली परंपरेचे तेजस्वी वाहक तसेच साहित्य व राष्ट्रचेतनेचे प्रभावी पुरस्कर्ते म्हणून अत्यंत प्रभावीपणे घेतला आहे. या ग्रंथात ‘आरोपी ते अधिवक्ता सत्याची मशाल घेऊन उभा राहिलेला योद्धा’ म्हणून त्यांच्या संघर्षशील जीवनप्रवासाचे सविस्तर चित्रण केले आहे. तसेच पद्मश्री नामांकनामुळे उजळून निघालेली त्यांची जीवनयात्रा आणि अखिल भारतीय नैसर्गिक चिकित्सा आंदोलनातील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका हे प्रेरणादायी व गौरवशाली अध्याय विस्ताराने मांडले आहेत. यासोबतच ‘भारताला सूर्यराष्ट्र घोषित करण्यात यावे’ या ऐतिहासिक संकल्पनेचे कॉपीराइट प्राप्त करणारे भारतातील पहिले व एकमेव व्यक्ती म्हणून ॲड. क्रांती महाजन यांची विशेष ओळख, ‘हर घर सोलर’ या आत्मनिर्भर व ऊर्जा-संपन्न भारताचा मार्ग दर्शविणाऱ्या दूरदर्शी ऊर्जा-दृष्टीकोनाचा विचार, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तत्त्वांना जीवनात आत्मसात करून राष्ट्रसेवेसाठी समर्पित केलेले त्यांचे कृतार्थ जीवन या सर्व मूल्याधिष्ठित विचारांचा व संघर्षांचा समग्र आलेख या पुस्तकात साकारण्यात आला आहे.
येथे उल्लेखनीय आहे की, यापूर्वी लखनौ येथील क्रिएटीव्ह मीडिया पब्लिकेशन तर्फे डॉ. एस. के. सोनी लिखित इंग्रजी पुस्तक ‘The Beacon of Inspiration – Dr. Kranti Mahajan’ प्रकाशित झालेले आहे . त्यामुळे ॲड. क्रांती महाजन यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ही दुसरी अधिकृत जीवनचरित्रात्मक कृति असून, ती उत्तराखंडच्या लेखिका डॉ. रूपाली वशिष्ठ यांनी सखोल अभ्यास व संशोधनाच्या आधारे देशातील वाचकांसाठी सादर केली आहे. नीलम प्रकाशनातर्फे हे पुस्तक अॅमेझॉन व फ्लिपकार्ट या प्रमुख ऑनलाइन मंचांवरही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
.png)
0 Comments