Hot Posts

6/recent/ticker-posts

नूतन नगरसेवक व चेअरमन महेश इंगळे यांचा स्विमींग ग्रुपकडून सत्कार

 नूतन नगरसेवक व चेअरमन महेश इंगळे यांचा स्विमींग ग्रुपकडून सत्कार


अक्कलकोट (कटूसत्य वृत्त): अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत सलग पाचव्या टर्ममध्ये निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तसेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या दणदणीत विजयामुळे स्विमींग ग्रुपचा अभिमान वाढल्याचे मत स्विमींग ग्रुपचे सदस्य व एच. पी. पेट्रोल पंपाचे मालक सचिन किरनळ्ळी यांनी व्यक्त केले.

महेश इंगळे यांच्या निवडणूक विजयाचे औचित्य साधून स्विमींग ग्रुपच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सचिन किरनळ्ळी बोलत होते.

या सत्कारप्रसंगी स्विमींग ग्रुपचे सदस्य प्रथमेश इंगळे, सचिन किरनळ्ळी, संतोष पराणे, बाबा सुरवसे, बाळासाहेब एकबोटे, सुनील पवार, मेजर अमोल माने, अंकुश केत, रमेश कणबुसे, राजू एकबोटे, सुरेश पाटील, दर्शन घाटगे, अरविंद पाटील, तन्मय इचगे, विद्याधर गुरव, रमेश शिंदे, महादेव आडवीतोटे, मल्लिनाथ माळी, संतोष जवळगे, रफिक पठाण, श्रीकांत झिपरे, प्रा. शिवशरण अचलेर, प्रसाद पाटील, मधुकर सदाफुले व ज्ञानेश्वर भोसले आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments