Hot Posts

6/recent/ticker-posts

शहरातील मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून सार्वजनिक शौचालयासाठी सामाजिक कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत

शहरातील मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून सार्वजनिक शौचालयासाठी सामाजिक कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत 
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सोलापूर शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.ठीक ठिकाणी असणारे सार्वजनिक शौचालयातील घाण पाणी अक्षरशे रस्त्यावर येत आहे.सार्वजनिक टॉयलेटची अवस्था बिकट असल्याने उघड्यावर लघुशंका करण्याचे प्रकार सर्रास वाढले आहेत.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा उग्र आणि तीव्र स्वरूपाच्या आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.
सोलापूर शहरातील ठिक ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयाची बिकट दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी इ टॉयलेटची दुरावस्था झाली आहे.इ टॉयलेट म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे.इ टॉयलेटच्या बाजूलाच उघड्यावर मोठ्या प्रमाणात पुरुषवर्ग लघुशंका करताना आढळून येत आहे.त्यामुळे असे इ टॉयलेट्स काढून त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय मुताऱ्या बनवण्यात याव्यात. शहरात अनेक ठिकाणी महिलांच्या स्वच्छतागृहांचा अभाव व बंद अवस्थेतील इ टॉयलेट्स यामुळे आरोग्याचे धोके वाढत असून शहरात रोगराई पसरू शकते, अशी भीती सामाजिक कार्यकर्ते पै.माऊली हेगडे यांनी व्यक्त केली आहे.
शहरातील अनेक ठिकाणीची मोफत सार्वजनिक शौचालये काही व्यक्तींनी विनापरवाना पाडल्याने  खरेदीसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला पुरुष वर्गाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.अनेक स्वच्छतागृहांमध्ये पाणी नाही.अनेक स्वच्छताग्रहांची वेळेवर दुरुस्तीची व्यवस्था नसल्याने ती वापरण्यास अयोग्य ठरली आहेत.शहरातील व्यापारी भागात, गर्दीची ठिकाणी व महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी मोफत शौचालयांची संख्या अत्यंत कमी असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना मोठी गैरसोय सोसावी लागत आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्याकडे धार्मिक पर्यटन म्हणून मोठ्या संख्येने भाविक येत असतात.सध्या सोलापूर शहर हे मेडिकल हब म्हणून उदयास येत आहे.सोलापूर हे शैक्षणिक क्षेत्रात देखील मोठी प्रगती करणारे शहर झाले आहे.मोठ्या संख्येने खरेदीसाठी ग्रामिक भागातील लोक येत आहेत.धार्मिक, शैक्षणिक, मेडिकल आणि व्यवसायासाठी येणाऱ्या लाखों लोकांना सार्वजनिक शौचालय उपलब्ध होत नसल्याने शहराचे नाव बदनाम होत आहे.याबाबत आम्ही पालकमंत्री जयकुमार गोरे यांना माहिती देऊन मनपा विरोधात आंदोलन छेडणार आहोत.
सामाजिक कार्यकर्ते पै.माऊली हेगडे
Reactions

Post a Comment

0 Comments