सोलापूर महापालिकेची अंतिम प्रभागनिहाय यादी जाहीर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यातील मतदार यादीचा कार्यक्रम वारंवार मुदतवाढ दिल्यानंतर अखेर सोमवारी पूर्ण झाला. महापालिका निवडणूक विभागाकडे प्राप्त झालेल्या हरकतींपैकी ९१ हरकती फेटाळण्यात आल्या असून अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. २० नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. दिलेल्या मुदतीत एकूण ५५५ हरकती व सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी ४६४ हरकती मान्य करून त्यानुसार आवश्यक सुधारणा व अंमलबजावणी करण्यात आली, तर उर्वरित ९१ हरकती फेटाळण्यात आल्या.
फेटाळण्यात आलेल्या हरकतींमध्ये एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट असल्याच्या तसेच विधानसभा मतदार यादीत नावे असूनही महापालिका निवडणुकीच्या यादीत नसल्याच्या हरकतींचा समावेश होता. या सर्व बाबींवर महापालिकेच्यावतीने आवश्यक कार्यवाही करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात हस्तांतरित करण्यात आलेल्या मतदारांची संख्या ३२ हजार १४० इतकी असून ही संख्या एकूण मतदारांच्या ३.५ टक्के असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
.png)
0 Comments