आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप
अकलूज (कटूसत्य वृत्त):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे वाढदिवसानिमित्त आज श्रीपूरमध्ये श्री सेवा रुग्णालयमध्ये डॉ.सुहास बनसोडे यांनी आरपीआय श्रीपूर शहर शाखा यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये रुग्णांना फळे वाटप व बिस्किटे वाटप श्रीपाद ऊर्फ भाऊसाहेब कुलकर्णी व आरपीआयचे सोलापूर जिल्हा संघटक तुकाराम बाबर यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी आरपीआयचे सोलापूर जिल्हा सचिव भारत आठवले,ज्येष्ठ पत्रकार बी.टी.शिवशरण,श्रीपूर शहर अध्यक्ष गणेश सावंत,शहर शाखेचे खजिनदार रमेश भोसले,माजी ग्रामपंचायत सदस्य गौतम आठवले, कामगार संघटना नेते भालचंद्र शिंदे. पाटील के बी शिखरे सर,राजू पाटील समाधान साठे,पोपट आखाडे,गटू वजाळे इत्यादी उपस्थित होते या.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते तुकाराम बाबर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संघर्षमय जीवन प्रणालीवर व दलित पँथर ते रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी चळवळ यामध्ये रामदास आठवले यांचे योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी डॉ.सुहास बनसोडे यांनी रामदास आठवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हटले की,गल्ली ते दिल्ली पर्यंत रामदास आठवले यांनी परिवर्तन घडवून पक्षाला मजबूत केले आहे. आरपीआय चा कार्यकर्ता आक्रमक व सामाजिक लढ्यात अग्रेसर आहे. त्यामुळे आरपीआयची सगळीकडे हवा आहे.श्रीपूर परिसरात रामदास आठवले यांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

0 Comments