विज्ञान प्रदर्शनाचे कुलगुरू डॉ. महानवर यांच्या हस्ते उद्घाटन
अनगर (कटूसत्य वृत्त):- अनगर येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय अनगरच्या विज्ञान विभागाने वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केलेले होते
त्याचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या शुभहस्ते आणि दयानंद कॉलेजचे प्राचार्य विजयकुमार उबाळे डॉ.एस आर पुजारी प्राचार्य चंद्रकांत ढोले प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी उपप्राचार्य महादेव चोपडे पर्यवेक्षक महादेव खरात यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
प्राचार्य चंद्रकांत ढोले यांच्या शुभहस्ते कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रयोगाची कुलगुरूंनी उत्सुकतेने माहिती घेतली त्यांना अनेक प्रश्न विचारले मुलांनी मांडलेल्या कल्पना त्यांना खूप आवडल्या.
लहान लहान प्रयोगांमधूनच मोठे शोध लागतात व शास्त्रज्ञ निर्माण होतात असे मत त्यांनी यावेळी मांडले.
या प्रदर्शनासाठी विज्ञान शिक्षक परमेश्वर थिटे उज्वला घोलप महादेव चोपडे माधवी पाचपुंड डॉ. प्रशांत कुलकर्णी सुनील सरक यांनी विशेष परिश्रम केले.

0 Comments