मराठा सेवा संघाच्या माढा तालुकाध्यक्षपदी निलेश देशमुख
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघाच्या माढा तालुकाध्यक्षपदी तांबवे टें ता.माढा येथील निलेश शशिकांत देशमुख यांची निवड करण्यात आली.
देशमुख यांनी माढा तालुक्यात मराठा सेवा संघाला नवीन पदाधिकारी जोडत त्यांचे प्रशिक्षण शिबीर घेतले तसेच मराठा सेवा संघाच्यावतीने काढण्यात आलेली जिजाऊ रथयात्रा कुर्डूवाडीत आली असता रथयात्रेचे यशस्वी आयोजन केले. तसेच अकलूज येथे पार पडलेल्या मराठा सेवा संघाच्या अधिवेशनासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. सोलापूर येथे झालेल्या मराठा सेवा संघाच्या बैठकीत निलेश देशमुख यांना मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष अमित निमकर, जिल्हा सचिव धनाजी मस्के यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाच्या पंढरपूर विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी मनोज पवार तर सहकोषाध्यक्षपदी नागेश व्यवहारे यांचीही माढा तालुक्यातून निवड करण्यात आली. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार, शहराध्यक्ष सुर्यकांत पाटील, लक्ष्मण महाडिक, दत्तात्रय गरदडे, संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष अभिमन्यू पवार,राज्य कार्यकारिणी सदस्य किरण घाडगे, सोमनाथ राऊत,राज्य संघटक मनोजकुमार गायकवाड, राज्य संघटक दिनेश जगदाळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जगताप यांच्यासह मराठा सेवा संघ व इतर कक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments