६० जणांचा प्रवेश, सोलापूर राष्ट्रवादीसाठी बळकटी आणणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-
राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या तीन दिवसाच्या दौऱ्यातील गुरुवारच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी सोलापूर शहरातील विविध राजकीय पक्षातील प्रमुखांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्यामुळे अनेक राजकीय पक्षांना धक्का देण्यात सोलापूरची राष्ट्रवादी यशस्वी ठरली आहे. तर प्रमुख पक्षातील दिग्गजांचा राष्ट्रवादी पक्षामधील प्रवेश सोलापूर राष्ट्रवादीसाठी बळकटी आणणारा ठरला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी आयोजित केलेल्या जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनातील पक्षप्रमुखांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाने सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे भारावून गेले. अजितदादा पवार यांना अपेक्षित असलेला वर्ग सोलापूरच्या राष्ट्रवादीमध्ये येत असल्याबद्दल अण्णा बनसोडे यांनी समाधान व्यक्त करत सोलापूर महानगरपालिकेची सत्ता आता राष्ट्रवादीपासून दूर नसल्याचे सांगत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. सोलापूर शहरात अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्यात यश आल्याचे सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी सोलापूर शहर - जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जेष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,आनंद चंदनशिवे, प्रदेश सरचिटणीस आनंद मुस्तारे,महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर, माजी नगरसेविका नूतन गायकवाड,प्रमोद भोसले, श्रीनिवास कोंडी, प्रकाश जाधव, सुरेखा घाडगे यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थिती होते.

0 Comments