रिन्यू सोलर पावर कंपनीकडून जिल्हा परिषद शाळेला बाकडे बेंच वाटप
अक्कलकोट(कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव, बॅगेहळी, अक्कलकोट रेल्वे स्टेशन दिघेवाडी आणि दहिटणे या सर्व गावांच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला रिन्यू सोलर कंपनीच्या वतीने सीएसआर फंडातून दिनांक 10 डिसेंबर रोजी कंपनीचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट ऋतुराज कटियार यांच्या हस्ते दीडशे बाकडे (बेंच) वाटप करण्यात आले. यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर जयदीप हजरणीस डेप्युटी जनरल मॅनेजर सुधीर रंजन प्रोजेक्ट मॅनेजर नंदकिशोर लहाने अक्कलकोट पोलीस स्टेशनचे प्रभारी पीआय दीपक भिताडे साहेब तसेच बॅगेहळीचे सरपंच रवी गायकवाड, कडबगाव, अक्कलकोट रेल्वे स्टेशन आणि दिघेवाडी चे सरपंच मान्यतेश पाटील भेटण्याचे सरपंच नितीन मोरे मान्यवर अजीज नदाफ तसेच जिल्हा परिषद शाळा कडबगावचे मुख्याध्यापक राजश्री पाटील, अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ शिंदे दिघेवाडी चे मुख्याध्यापक ईरया स्वामी दहिटणे शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज बिराजदार आणि बैगेहळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नारायण इरवाडकर हे सर्व उपस्थित होते समाजामध्ये काम करत असताना सामाजिक बांधिलकीची जाणीव असणे गरजेचे आहे आणि त्या सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून रिन्यू सोलर पावर कंपनीने पाच जिल्हा परिषद शाळांना 150 बाकडे ( बेंच) दिनांक 10 डिसेंबर रोजी वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एडमिन नीलपा लोहार आणि एडमिन पल्लवी कांबळे यांनी परिश्रम घेतले यावेळी कंपनीचे कर्मचारी नागरिक व जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments