Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन

 श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री सिद्धेश्वर देवस्थान यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवत असून यंदा प्रदर्शनाचे 55 वे वर्ष आहे. या निमित्ताने होम मैदान येथे 25 ते 29 डिसेंबर 2025 या 5 दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या कृषी प्रदर्शनात 300 स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद सोलापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्याने व स्मार्ट एक्स्यो ग्रुप च्या व्यवस्थापन अंतर्गत भरविण्यात येत आहे.

तसेच कृषी संशोधन केंद्र, सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र, रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर व मोहोळ दिमाग, रेशीम खादी ग्रामोद्योग, पशुसंवर्धन, सामाजिक वनीकरण व राष्ट्रीयकृत बँका, नाबार्ड, कृषी महाविद्यालय, कृषी स्टार्टअप उद्योजक, नवा उद्योजक, कृषी यांत्रिकीकरण, फळ रोपवाटिकाधारक, साखर कारखाने यांच्या सहभागाने आयोजित केले जाणार आहे.

सदर प्रदर्शन नियोजनबध्द व यशस्वीरित्या व्हावे तसेच कृषी प्रदर्शनाची माहिती जिल्ह्यातील शेतकरी बांधवापर्यंत पोहचावी याकरीता आज दि. 22 डिसेंबर 2025 रोजी पत्रकार परिषदचे आयोजन करून सर्व प्रसार माध्यमांच्या सहकार्याने माहिती देण्यात येत आहे. तरी श्री सिध्देश्वर कृषी प्रदर्शनात सर्व शेतकरी बांधव, उद्योजक व नागरिकांनी सहभागी होवून कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,

असे श्री. सिध्देश्वर यात्रा समिती आवाहन करीत आहे. या पत्रकार परिषदेला कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे, आत्माचे निवृत्त उपसंचालक विजयकुमार बरबडे, आर. एस. पाटील उपस्थित होते.

प्रदर्शनात या गोष्टी पहावयास मिळणार..!

1) शेतकऱ्यांना शेतातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती, कृषी यांत्रिकीकरण, दुग्धोत्पादन, रेशीम पीक, मधुमिक्षका पालन, फलोत्पादन तसेच कृषी उद्योजक निविष्ठा, नवीन स्टार्टअप व्हर्टिकल फार्मिंग, आधुनिक कृषी अवजारे इत्यादी विषयी सविस्तर माहिती पोहचण्यास सुलभहोईल.

2) महाराष्ट्रातील सोलापूर, नाशिक, पुणे बाएफ संस्था यांचेकडील शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेले अंदाजे 500 प्रकारचे दुर्मिळ देशी बी-बियाणे प्रदर्शित करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना विक्रीसाठीही उपलब्ध असणार आहेत.

3) दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत गाय, बैल, वासरू, म्हैस अशा विविधन पशु प्रजाती तसेच देशी गोवंश मधील विविध प्रजाती चे भव्य प्रदर्शन व स्पर्धा,

4) दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत 35 हून अधिक विविध देशी व विदेशी प्रजातींच्या श्वानांचे प्रदर्शन (डॉग-शो) व स्पर्धा. तसेच याचदिवशी सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 पर्यंत पुष्प रचना स्पर्धा.

5) दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 3.00 पर्यंत विविध प्रकारचे पाळीव मांजरांचे प्रदर्शन व स्पर्धा.

6) रोज क्लब सोलापूर यांच्या विशेष सहकार्यातून भव्य राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन 500 हुन अधिक विविध प्रकारचे गुलाब एकाच ठिकाणी पहावयास मिळणार..!
Reactions

Post a Comment

0 Comments