तुंगत च्या बालचमुनी केला १५५ किलो प्लास्टिक कचरा संकलन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे ग्रामपंचायतीचे वतीने महा स्वच्छता अभियान अंतर्गत प्लास्टिक संकलन केले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांचे मार्गदर्शना खाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व तुंगत ग्रामपंचायतीन् ही मोहिम राबविली. सरंपच डाॅ. अमृता रणदिवे यांनी मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत होत मोहिम राबविली. उपसरंपच प्रकाश रणदिवे, पंचायत अधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र नागणे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शिक्षकांची टीम ने ही मोहिम राबविली.
मोहिमेत 155 किलो प्लास्टिक संकलन..!
तुंगत जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी आज प्लास्टिक विरोधी मोहिम उघडली. प्रत्येक घरात जाऊन व परिसरातील १५० किलो पेक्षा अधिक प्लास्टिक ते संकलने केले. प्लास्टिक संकलना बरोबर ग्रामस्थांचे प्रबोधन केले. प्लास्टिक टाळा कापडी पिशव्यांचा वापर करा असा संदेश विद्यार्थांनी दिला.
कापडी पिशव्या वर भर - सरंपच डाॅ. अमृता रणदिवे
……………………..
तुंगत गावात प्लास्टिक संकलन मोहिम राबविणेत आली. लहान मुलांना देखील प्लास्टिक चे दुष्परिणाम समजावून सांगितले आहेत. यामुळे स्वच्छतेचे संस्कार मुलांवर होणेस मदत झाली आहे. प्लास्टिक का कापडी पिशव्यांचा पर्याय देत आहोत. मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात सर्व जण जोमाने उतरले आहेत असेही सरपंच डाॅ. अमृता रणदिवे यांनी सांगितले.
प्लास्टिक संकलन केंद्रात प्रक्रिया करणेत येणार - गटविकास अधिकारी अमोल जाधव
पंढरपूर तालुक्यात होणार प्लास्टिक कचरा संकलन करून तो प्रक्रिये साठी प्लॅस्टिक संकलन केंद्रात पाठविणेत येत आहेत. फाॅरवर्ड लिंकेज पर्याय दिला आहे. त्यामुळे संकलित झालेला तंत्रावर प्रकिया करणेत येत असल्याचे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी सांगितले. गोपाळपूर येथे मशीन बसविणेत आलेली आहेत. त्यांचे बारीक तुकडे करून विक्री करणेत येत आहे असेही त्यांनी सांगितले.
.png)
0 Comments