Hot Posts

6/recent/ticker-posts

घुगरदरे प्रशालेच्या वतीने शिक्षक-पालक कार्यशाळा संपन्न

 घुगरदरे प्रशालेच्या वतीने शिक्षक-पालक कार्यशाळा संपन्न




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- येथील अक्षय शिक्षण संस्था संचालित चंद्रकांत घुगरदरे प्रशाला व ज्यू. कॉलेजच्या वतीने शिक्षक पालक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. समुपदेशन काळाची गरज आहे, हे ओळखून ब्रेन वे फाउंडेशन,पुणे चे संस्थापक, समुपदेशक, मानसोपचारतज्ञ् डॉ. अशोक सोनवणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मौलिक मार्गदर्शन केले.
त्यांनी आपल्या मनोगतात बदलत्या परिस्थितीनुसार जे स्वतः मध्ये बदल करतात तेच यशस्वी होतात. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या पालकत्वामध्ये बदल अपेक्षित आहे. पालकांनी मुलांची कशी काळजी घ्यावी. गरज ओळखून त्यांना प्रोत्साहित करावे. त्यांना समजून घ्यावे. शरीरात निर्माण होणारे विविध हार्मोन्स व त्याचा मुलांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम होणारा परिणाम, मुलांचा आहार या दृष्टीने पालकांशी संवाद साधला.
मुलांच्या उच्च बुद्धीमत्ता विकासाच्या गरज, इच्छाशक्ती, जिज्ञासा, प्रोत्साहन,आवड, समजून घेणे, प्रेरणा, स्वयंप्रेरणा या आठ प्रकारच्या मानसिकता वर विशेष प्रकाश टाकला. पालक आणि शाळा यांनी एकत्र येऊन मुलांच्या भविष्याच्या योजना तयार कराव्यात, असे सांगितले.
या प्रसंगी अक्षय शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ.नरेंद्र कवितके, नंदकिशोर धालपे, डॉ. काजल कवितके, स्नेहल घुगरदरे, शिल्पा घुगरदरे,प्राची गोखले,राजेंद्र धुमाळ, अर्चना यलमार, योगिता बॅस्टीयन, अरुण आवळे इ. मान्यवर, इतर शाळांचे मुख्याध्यापक व पालकवर्ग उपस्थित होते.
समारंभाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्मिता आवळे यांनी केले. समारंभाचे सूत्रसंचालन सुखदेव वलेकर यांनी तर आभार प्रदर्शन पांडुरंग कुचेकर यांनी केले. समारंभ यशस्वी होण्यासाठी सर्व विभाग शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments